घरमुंबईउल्हासनगरमध्ये पालिकेविरोधात जनहित याचिका

उल्हासनगरमध्ये पालिकेविरोधात जनहित याचिका

Subscribe

या प्रकरणामध्ये राजकीय नेते आणि मनपा अधिकारी सामील असल्याचा आरोपही टाले यांनी करून, प्रकरणाची शासनातर्फे चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेत केली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत मिळकतींचे कंत्राटदारामार्फत सर्व्हेक्षण करण्यासाठी मंजूर झालेल्या जी आय एस ( ग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ) चा पीपल रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी विरोध केला आहे . या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करून त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे .
उल्हासनगर महानगरपालिकेच्या भागभांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी साठी जी आय एस मॅपिंगचा वापर करण्यात येणार आहे. उल्हासनगर मनपाच्या हद्दीत जवळपास २ लाखांच्या आसपास मिळकती आहेत. जी आय एस सिस्टीम द्वारे या मिळकतींचा शोध लावला जाऊ शकतो व नवीन मिळकतींचा देखील शोध लावून त्याप्रमाणे कर आकारणी करण्यात येईल .
उल्हासनगर मनपा तर्फे टेंडर निविदा प्रक्रिया ही एकाच ठेकेदाराला फायदा पोहचेल अशा रीतीने बनविण्यात आलेला आहे. इतर नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये ५०० रुपये प्रति मिळकत असे दर असतांना उल्हासनगर महानगरपालिकेत ८५५ रुपये प्रति मिळकत असे दर लावण्यात आले आहेत . त्यातही रखरखाव साठी देखील अवाढव्य खर्च आकारण्यात आला असल्यामुळे १ ० ते १५ कोटीची जादा लूट केली जात आहे . असा आरोप पीपल रिपब्लिकन पार्टीचे नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला आहे.
या प्रकरणामध्ये राजकीय नेते आणि मनपा अधिकारी सामील असल्याचा आरोपही टाले यांनी करून, प्रकरणाची शासनातर्फे चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्रमांक १२०४९ साल २०१९ , १८ एप्रिलला दाखल केली आहे.या संदर्भात मनपा आयुक्त अच्युत हांगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मी एका कामानिमित्त बाहेरगावी आलेलो आहे, या विषयावर लवकरच स्पष्टीकरण देणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -