घरदेश-विदेशR Thyagarajan : आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केली 62 अब्ज संपत्ती वितरित; कोण आहेत...

R Thyagarajan : आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केली 62 अब्ज संपत्ती वितरित; कोण आहेत हे भारतीय टायकून?

Subscribe

R Thyagarajan : गुजरातमधील हिरे व्यापारी दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना कार, पैसे देतात तर, काही बॉस कर्मचाऱ्यांना घरही खरेदी करुन देतात, अशा बातम्या आपल्या वाचनात आल्या आहेत. अशा बातम्यांमुळेच अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की, बॉसने आपल्याही कामाची दखल घ्यावी आणि आपल्यालाही काहीतरी कधीतरी मिळावे. कारण असे भाव पैशाने विकत घेता येत नाहीत. आता अशी बातमी समोर येत आहे की, एक बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल 62 अब्ज संपत्ती वितरीत केली आहे. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. (R Thyagarajan Distributed 62 billion wealth among his employees Who are these Indian tycoons)

आपण वाहन खरेदी करताना त्या वाहनाबद्दल आणि वाहन बनवणाऱ्या कंपनीबद्दल माहिती घेतो. गेल्या काही वर्षात एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे श्रीराम फायनान्सचे. श्रीराम फायनान्स नावारुपाला आणणारे आर त्यागराजन (R Thyagarajan) हे जगातील मोजक्या वित्त पुरवठादारांपैकी एक आहेत. त्यांचा अब्जावधींचा व्यवसाय असून श्रीराम समूहाने मोठी झेप घेतली आहे. भारतातील अनेक शहरांपासून ते खेड्यांपर्यंत श्रीराम फायनान्स ही कंपनी पोहचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 : चांद्रयानने कक्षा बदलली, चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले

एक लाखांहून अधिक जणांना आपले स्वप्न पूर्ण करण्याचे मिळाले बळ

भारतातील मध्यमवर्ग आणि गरीबांना ट्रक, टॅक्टर किंवा इतर वाहन खरेदीसाठी आर त्यागराजन यांच्या श्रीराम समूहाने आर्थिक मदत केली आहे. श्रीराम समूह विमा, कर्ज आणि स्टॉक ब्रोकिंगसह अनेक सेवा उद्योगात अग्रेसर आहे. या समूहात एक लाखांहून अनेकजण काम करतात. श्रीराम समूहाच्या प्रगतीमुळे अनेकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मिळाले आहे.

- Advertisement -

1974 मध्ये श्रीराम फायनान्सची मुहूर्तमेढ

86 वर्षीय आर त्यागराजन यांचा जन्म समृद्ध, श्रीमंत शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्ससह काही ठिकाणी नोकरी केली. परंतु गरीबांसाठी काहीतरी करायचे हे चिंता त्यांना शांत बसू देत नव्हती. गरीब लोकांना कोणीच कर्ज देत नाही. त्यामुळे त्यांनी 1974 मध्ये श्रीराम फायनान्स समूहाची मुहूर्तमेढ रोवताना चेन्नईत कंपनीची स्थापना केली आणि श्रीराम फायनान्स हा पर्याय गरीबांसाठी निर्माण केला. त्यागराजन यांनी आपण डाव्या विचारणीचे असल्याचे नेहमीच सांगितले आहे. त्यामुळेच भांडवलवादापेक्षा समाजवादावर त्यांची निष्ठा अधिक आहे.

हेही वाचा – 137 दिवसांनंतर लोकसभेत, 36 मिनिट बोलले; राहुल गांधींच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे

शेअर बाजारातही श्रीराम समूहाची चांगील कामगिरी

श्रीराम समूहात सध्याच्या घडीला 30 हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांनी शेअर बाजारात मोठा पल्ला गाठला आहे. शेअर बाजारात चढउताराचे सत्र असतानाही श्रीराम समूहाच्या कंपन्यांवर गुंतवणूकदारांनी मोठा विश्वास दाखवल्याचे पाहायला मिळाले आहे. या समूहातील अनेक कंपन्यांनी यंदा शेअर बाजारात 35 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात या समूहातील कंपन्यांनी रेकॉर्ड तयार केला आहे. भारतीय बेंचमार्क स्टॉक इंडेक्सपेक्षाही चार पट अधिक उडी या समूहातील कंपन्यांनी घेतली आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेड या प्रमुख कंपनीचे बाजारातील भांडवल 8.5 अब्ज डॉलरपर्यंत आहे. जूनच्या तिमाहीतही या कंपनीने जवळपास 200 दशलक्ष डॉलरचा नफा कमावला.

श्रीराम समूहाकडून कर्मचाऱ्यांसाठी ट्रस्ट

आर त्यागराजन यांनी सध्याच्या घडीला स्वतःला सिद्ध केले. साध्या राहणीमानावर त्यांचा आजही मोठा विश्वास असल्यामुळे त्यांनी कधीही मोबाईल सुद्धा वापरला नाही. आर त्यागराजन यांनी 2006 साली आपल्या समूहातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक ट्रस्ट अस्तित्वात आणली. त्यांनी त्यांच्याकडील $750 दशलक्ष म्हणजेच 62,166,225,000 भारतीय रुपये या ट्रस्टच्या नावे केले आहेत. या पैशांचा वापर सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -