घरमुंबईराहुल गांधींनी मुंबईकरांची चिंता करू नये - मुख्यमंत्री फडणवीस

राहुल गांधींनी मुंबईकरांची चिंता करू नये – मुख्यमंत्री फडणवीस

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस सरकारने मागील अनेक वर्षांपासून मुंबईचा विकास केला नाही तर त्यांना आता मुंबईकरांची काळजी घेण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटलं.

जे आपल्या कार्यकाळात ५० वर्षे गरिबाला घर देऊ शकले नाहीत ते मुंबईकरांना घर कधी देणार असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. राहुल गांधी यांनी मुंबईकरांची चिंता करू नये अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईत खासदार पूनम महाजन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला एअरपोर्ट लँड वरील रहिवाशांचा हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लावत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चाव्या वाटल्या त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा नुकतीच मुंबईत वांद्रा कुर्ला संकूलात झाली होती.

गांधींनी केली होती टीका

नुकतेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईच्या जाहीर सभेत आमचे सरकार आले तर सर्वसामन्याला ५५० स्केअर फुटांचे घर देऊ असे जाहीर केले याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरपूस समाचार घेतला. १० वर्षे आघाडीचे सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते मात्र एकही प्रश्न सोडवू हे शकले नाही नसल्याचे सांगत ते सरकार सामान्यांचे नव्हते असा घणाघातही त्यांनी केला. दरम्यान यावेळो मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडवत मुंगेरी लाल कि हसीन सपने कभी पुरे नहीं होते असा टोला देखील लगावला.

- Advertisement -

जिथे नरेंद्र मोदी तिथे काहीही शक्य नाही

दरम्यान जिथे जिथे नरेंद्र मोदी तिथे काहीही शक्य नाही असे सांगत राजीव गांधी मुंबईत येऊन बोलले होते. धारावीला पैसे देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र ३० वर्षे फक्त धारावीच्या योजना झाल्या मात्र एकही काम झालं नाही अशी टीका देखील मुख्यमंत्र्यानी केली. एवढंच नाही तर जे ३० वर्षात झालं नाही ते आम्ही ३ वर्षात करून दाखवल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मुंबईत २०११ पर्यंत जे लोक राहतात त्यांना आम्ही पात्र करून प्रत्येकाला पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर देणार असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले आहे. आमच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे मी २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर द्यायचं आहे त्यामुळे सर्वसामन्यांनाच्या घरांचे स्वप्न हे सरकारच पूर करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आम्ही जटिल प्रश्न देखील सोडवतो

महानगरपालिका निवडणुकिला मी कुर्ला येथील रहिवाशांना सांगितल होतं कितीही प्रश्न जटील असला तरी सोडवता येतो. ते आम्ही आजचावी वाटप करून सिद्ध केल्याचे मुख्यमंत्री म्हणालेत. मागील गेली दिडवर्षे आम्ही दर आठवड्याला बैठका घेतल्या आणि सर्व अडचणींवर मात करून घरांचा प्रश्न सोडवल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -