घरमुंबईमुंबई सेंट्रल स्थानकावर रेल्वे बफरला धडकली

मुंबई सेंट्रल स्थानकावर रेल्वे बफरला धडकली

Subscribe

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर फिरोजपूर जनता एक्सप्रेस बफरला धडकली. प्लॅटफॉर्मवर गर्दी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, प्लॅटफॉर्मचा सिमेंटचा काही भाग या दुर्घटनेत तुटला आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संबंधात बोलताना रेल्वे अधिकारी म्हणाले की, गाडी एम्पटी रँकवर होती. यावेळी गाडी थोडी पुढे मागे करताना ही घटना घडली. गाडीत प्रवासी नव्हते. गाडी खाली होती. मात्र मोटरमनच्या चुकीमुळे गाडी बफरला धडकली. या घटनेप्रकरणी लोको पायलटला आम्ही निलंबित करणार असेही रेल्वे अधिकारी म्हणाले आहेत. दरम्यान, या घटनेचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -