घरमनोरंजनBigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे ठरला 'बिग बॉस २'चा विजेता

Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे ठरला ‘बिग बॉस २’चा विजेता

Subscribe

गेल्या शंभर दिवसांपासून सुरु असलेला बिग बॉस या मराठी रिअॅलिटी शोच्या प्रवासाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिव ठाकरे हा 'बिग बॉस२' चा विजेता ठरला आहे. अंतिम फेरीत शिवने नेहा शितोळेचा पराभाव केला.

अभिनेता शिव ठाकरे ‘मराठी बिग बॉस सिझन नंबर २’चा विजेता ठरला आहे. अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिव ठाकरे यांच्यात चुरशी लढाई झाली. मात्र, अखेर शिवने बाजी मारली. शनिवारी ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सामना प्रदर्शित झाला. महाअंतिम सामन्यासह गेल्या शंभर दिवसांपासून सुरु असलेला प्रवास अखेर संपला आहे. गेल्या सीझन सारखाच यावर्षीचा सीझन देखील लोकप्रिय ठरला. या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि वीना जगताप यांची लव्ह स्टोरी चर्चेचा विषय ठरली. या प्रेम कहानीचे हळवे क्षणही बिग बॉसच्या कॅमेऱ्याने अचूकपणे कैद केले. त्यामुळे प्रेक्षकांनी या प्रेमी युगलवर मनभरुन प्रेम केले.

- Advertisement -

बिग बॉसमध्ये लढत, झगडत, झुंज देत शिवने विजयावर आपले नाव कोरले. या प्रवसात शिव अनेक कठीण प्रसंगाला सामोरे गेला. याशिवाय अनेक चुकाही शिवकडून अनावधाने झाल्या. मात्र आपल्या चुका मान्य करत शिव पुढे चालत राहिला. या प्रवासात तो अभिनेत्री विना जगतापच्या प्रेमात पडला. दोघांचे विचार जुळले आणि दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम जडले. त्यांचे हेच प्रेम प्रकरण ‘बिग बॉस मराठी सीझन २’ हा रिअॅलिटी शो चर्चेत ठरण्याचे सर्वात मोठे कारण ठरले. शिवच्या बाबतीत अनेक अंदाज बांधले गेले. मात्र, अखेर तो विजयी ठरला.

साहसी, धाडसी, जिगरबाज, लढवय्या अशा विविध विशेषनांनी शिव ठाकरेचे वर्णन केले गेले. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात शीव हा अपात्र असल्याची टिका घरातील इतर सदस्यांनी केली. मात्र, प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर शिवने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले. बिग बॉस घरातील सदस्यांचा त्याने विश्वास संपादत करत घरातील कॅप्टन पद भूषविले आणि आज पाहता पाहता त्याने विजयाची ट्रॉफी मिळवली.

- Advertisement -

कोण आहे शिव ठाकरे?

रोडिज मधून आलेला शिव ठाकरे हा मूळचा आमरावतीच आहे. सुरूवातीपासूनच शिव सगळ्यांचा लाडका झाला होता. गेले आठवड्यात सुरू असणाऱ्या पब्लिक पोलवरून देखील शिव ठाकरे कायम पहिल्या क्रमांकावर होता. हे दुसरे पर्व सुरू झाल्यानंतर वीणा जगतापच्या शिव प्रेमात पडला. त्यामुळे काही दिवस त्याचा गेमवरून लक्ष काहीसे हलले. तो सतत वीणाच्या मागे मागे फिरू लागला. पण प्रत्येक विकेंडच्या डावाला महेश मांजरेकरांनी कानटोचल्यामुळे पुन्हा एकदा शिव मोठ्या जिद्दीने टास्क खेळू लागला.

 

नेहा आणि शिवमध्ये विजेतेपदासाठी टक्कर

गेल्या आठवड्यात घेतलेल्या पब्लिक पोलमध्ये देखील शिव पहिल्या क्रमांकावर तर नेहा दुसऱ्या क्रमांकावर होती. त्याचप्रमाणे फिनालेला देखील शिव आणि नेहामध्ये टक्कर झाली. नेहा ही देखील आपल्या बिनधास्त बोलण्यामुळे आणि तीच्या टास्क खेळायच्या स्टायलीनने प्रेक्षकांची आवडती झाली होती. नेहा धाकड गर्ल असं नावही घरातल्यांनी दिलं होती. नेहाने हळूहळू करत घरातील सदस्यांची मनं जिंकली म्हणूनच तीला टिकीट फिनाले हे घरतल्या सदस्यांनी दिले होते. नेहालाही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -