घरमुंबईसरकारी कर्मचार्‍यांवर रेल्वेची कृपादृष्टी

सरकारी कर्मचार्‍यांवर रेल्वेची कृपादृष्टी

Subscribe

रेल्वेने सरकारी कर्मचार्‍यांवर कृपादृष्टी केली असून त्यांना प्रवासासाठी तिकिटात सवलत दिली आहे. अधिकाधिक लोकांनी रेल्वेच्या सेवांचा वापर करावा, यासाठी ही सवलत योजना जाहीर केली आहे.

रेल्वेने सरकारी कर्मचार्‍यांवर कृपादृष्टी केली असून त्यांना प्रवासासाठी तिकिटात सवलत दिली आहे. अधिकाधिक लोकांनी रेल्वेच्या सेवांचा वापर करावा, यासाठी ही सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेचा फायदा सरकारी कर्मचार्‍यांना होणार आहे. सरकारी कामासाठी बाहेरगावी जाणार्‍या कर्मचार्‍यांना ही सवलत असून त्यांना अर्ध्या किमतीत तिकीट मिळणार आहे.

रेल्वे सेवेचा सरकारी पातळीवर वापर व्हावा, असा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाने सुरू केला होता. ही सवलत त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात आले. शासकीय, निमशासकीय, केंद्रीय कर्मचार्‍यांनी सरकारी कामानिमित्त इतर शहरांमध्ये जाण्यासाठी रेल्वेचा वापर करावा, यासाठी ही सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, पालिकांमधील कर्मचार्‍यांना या सवलतीचा फायदा मिळणार आहे.

- Advertisement -

याशिवाय नोकरीच्या मुलाखतीसाठी बाहेरगावी जाणार्‍या उमेदवारांनाही ही सवलत मिळणार आहे. ही सवलत मूळ तिकिट रकमेच्या ५० टक्के इतकी असेल. ही सवलत फक्त स्लिपर आणि जनरल डब्ब्यातून प्रवास करण्यासाठीच दिली जाणार आहे. याशिवाय एखादी व्यक्ती मानव उत्थान सेवा समितीच्या नॅशनल इंटीग्रेशन कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार असेल, तर त्या व्यक्तीस रेल्वेच्या तिकीटावर ४० टक्के सूट मिळणार आहे. रेल्वेच्या आईआरसीटीसीकडून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार्‍या पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासात सवलत दिली जाते. यामध्ये दिल्ली ते केरळ यात्रा करणार्‍या प्रवाशांना खास सवलत दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -