घरमुंबईगडप झालेला पाऊस परतला मुंबईकरांचा विकेण्ड गारेगार !

गडप झालेला पाऊस परतला मुंबईकरांचा विकेण्ड गारेगार !

Subscribe

दोन आठवड्यांपूर्वी दमदार हजेरी लावत गडप झालेल्या पावसाने शनिवारी पुन्हा हजेरी लावत मुंबईकरांना दिलासा दिला. त्यातच रविवारी पावसाने जोर धरल्यामुळे मुंबईकरांच्या वीकेण्ड सेलिब्रेशनला उधाण आल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळाले. कोसळणारा मुसळधार पाऊस आणि रविवारची सुटी असल्याने मुंबईकरांनी समुद्र किनारी गर्दी केली होती. तर अनेक ठिकाणी तुंबलेल्या पावसाच्या पाण्यात लहान मुले आनंद लुटत होती.

मुंबई वेधशाळेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शनिवारपासूनच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. शनिवारी दिवसभर पडल्यानंतर पावसाने आपला धडाका रविवारीही कायम ठेवला. रविवारी सकाळपासून मुंबई शहर व उपनगरात पाऊस जोरदार पडला. रविवारी सकाळी कुलाबा येथे १५१ मिमि तर सांताक्रूझ येथे ३१ मिमि पावसाची नोंद झाली होती. रविवारी सकाळी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. दुपारपासून उपनगरात पावसाने जार धरला.

- Advertisement -

दिवसभरात जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांनी गिरगाव, दादर, जुहू चौपाटीवर तसलेच गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत पावसाचा आनंद लुटला. यावेळी समुद्रावर येणाèया लाटा व पावसामध्ये तरुण व तरुणी सेल्फी काढण्याचा आनंद घेत होते.

दोन दिवस पाऊस सतत पडत असला तरी कोठेही पाणी तुंबण्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे कोठेही वाहतुकीवर सहसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. मात्र पूर्व उपनगत दोन ठिकाणी घराचा काही भाग कोसळल्याच्या दोन घटना घडल्या. चेंबूर येथील घटनेत ७५ वर्षीय व्यक्ती किरकोळ जखमी झाली. त्याचबरोबर शहर व उपनगरात शॉर्टसर्किटच्या नऊ घटना घडल्या. यामध्ये शहरात सर्वाधिक पाच तर पश्चिम उपनगरात तीन व पूर्व उपनगरात एका ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

१७ ठिकाणी कोसळली झाडे
पावसामध्ये झाडे कोसळण्याच्या हमखास घटना घडतात. रविवारी मुंबईत १७ ठिकाणी झाडे कोसळली. यामध्ये शहरात सात, पश्चिम उपनगरात सात व पूर्व उपनगरात तीन ठिकाणी झाडे कोसळली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -