घरदेश-विदेशप्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने केला खून

Subscribe

शैलजा हत्येप्रकरणी लष्कर प्रमुखाला दिल्ली पोलिसांनी मेरठ येथे अटक केली आहे. निखील रॉय हांडा असे या लष्कर प्रमुखाचे नाव असून तो शैलजाचे पती अमित याचा मित्र आहे. मेरठ येथे राहून निखीलने ही हत्या घडवून आणली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी निखीलचा मोबाईल जप्त केले असून त्याला तपासासाठी पाठवण्यात आले. निखीलने मागील ३ महिन्यात ३ हजार ३०० कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबध असल्याची कबूली निखीलने दिली असून हे संबध पुढे कायम ठेवण्यास शैलजाने नकार दिल्यामुळे तीचा खून करण्यात आला.

 

- Advertisement -

कसा घडला गुन्हा

शनिवारी दिल्ली येथील मेट्रो स्थानकाजवळील लष्कर छावनी समोर शैलजाला मृतदेह आठळला होता. प्रथम पोलिसांनी या घटनेची अपघात म्हणून नोंद केली होती. मात्र तीचा गळा कापून गाडीखाली चिरडण्यात आले असल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवला. शैलजा आणि निखीलदरम्यान प्रेमसंबध असल्याची माहिती शैलजाच्या पतीला होती. त्याने अनेकदा शैलजाला निखीलपासून दूर रहायला सांगितले होते. निखीलशी व्हिडिओ कॉलवर बोलताना पतीने बघीतल्यानंतर शैलजाने निखीलशी बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात ठेऊन हा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

या घटनेपूर्वी शैलजा आर्मी रुग्णालयात गेली होती. पोलिसांनी या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली. या फुटेजच्या आधारावर एक होंडा सिटी गाडी पोलिसांनी ट्रेस केली. मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या हत्येत निखील रॉयचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. निखील आणि शैलजामध्ये प्रेमसंबध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. खून केल्यांनतर निखील मेरठ येथील लष्करी छावनीत येऊन लपला होता. निखीलचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर पोलिसांना त्याच्या लोकेशनबद्दल माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या तीन तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आज दूपारी लष्कर छावनीतून त्याला अटक करण्यात आली. सध्या निखील पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -