घरमुंबईमुंबईकरांना पाऊस दिलासा : तलावांत सहा दिवसांत जमा झाला 16 दिवसांचा...

मुंबईकरांना पाऊस दिलासा : तलावांत सहा दिवसांत जमा झाला 16 दिवसांचा पाणीसाठा

Subscribe

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 25 जून रोजी सकाळी 6 पर्यंत फक्त 93,972 दशलक्ष लिटर (6.49%) इतका म्हणजे पुढील 24 दिवस पुरेल इतकाच ( मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.) पाणीसाठा शिल्लक होता. मात्र 30जून रोजी तलावांतील पाणीसाठा 1,57,412 दशलक्ष लिटर इतका (11.88%) नोंदविण्यात आला आहे. 25 ते 30 जून या कालावधित मुंबई व ठाणे जिल्हा परिसरात कोसळलेल्या पावसामुळे अवघ्या सहा दिवसात तलावांतील पाणीसाठयात 63,440 दशलक्ष लिटर (4.39%) इतकी म्हणजे तब्बल 16 दिवसांच्या पाणीसाठ्याची वाढ झाल्याचे दिसून येते.

त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात गेल्या 6 दिवसात झालेली वाढ मुंबईकरांना काहीशी दिलासा देणारी आहे. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत गेल्यास व सात तलावांत अपेक्षित पाऊस पडल्यास लवकरच सर्व तलाव भरून वाहू लागतील, अशी मुंबईकरांची भाबडी अपेक्षा आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैरतणा, भातसा या पाच प्रमुख तलावांतून व विहार व तुळशी या कमी क्षमता असलेल्या दोन अशा एकूण सात तलावांत पावसाचे पाणी जमा झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याच्या माध्यमातून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

- Advertisement -

हेही वाचाःBMC : खड्डे बुजविण्यासाठी ‘रिॲक्टीव्ह अस्फाल्ट’चा प्रयोग यशस्वी; दोन तासांत वाहतूक होते सुरळीत

त्याशिवाय मुंबई महापालिका ( ठाणे जिल्हा परिसरातील धरणांमधून पाणी वापरते यास्तव) ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिकेलाही १५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करीत असते. त्यामुळे मुंबई महापालिका दीड कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांची, मुंबईत दररोज कामाला येणाऱ्या 40 लाख मुंबईबाहेरील नागरिकांची आणि ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिका परिसरातील काही लाख लोकांची दररोजची तहान भागवते. त्याशिवाय मुंबईतील व्यवसाय, उद्योगधंदे, इमारती बांधकामे आदी ठिकाणीही मुंबई महापालिका पाणीपुरवठा करते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांकडे पावसाने 23 जूनपर्यंत पाठ फिरवल्याने तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी कमी होत गेला. मात्र 24 जूनपासून आजपर्यंत मुंबईत व ठाणे जिल्हा परिसरात पावसाने बरसात सुरू केली. परिणामी सात तलावातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली आहे.

- Advertisement -

 

तलाव पाणीसाठा आतापर्यंत, पाऊस मिमी

उच्च वैतरणा ०                                  २६९.००

मोडकसागर ४३,३५५                           ६६५.००

तानसा ४७,४३८                                 ४८९.००

मध्य वैतरणा २८,३९५                           ३४७.००

भातसा २६,५९९                                 ४३८.००

विहार ८,५३५                                    ५५३.००

तुळशी ३,०९०                                    ७५९.००
———————————————————-
एकूण १,५७,४१२                                   १०.८८

 

तलावातील पाणीसाठ्यात अशी झाली वाढ

# २५ जून स.६ पर्यंत ९३,९७२ दशलक्ष लिटर

# २६ जून स.६ पर्यंत ९५,१२३ दशलक्ष लिटर

# २७ जून स.६ पर्यंत १,००,८७३ दशलक्ष लि.

# २८ जून स.६ पर्यंत १,०५,१०९ दशलक्ष लि.

# २९ जून स.६ पर्यंत १,२९,३४८ दशलक्ष लि.

# ३० जून स.६ पर्यंत १,५७,४१२ दशलक्ष लि.

 

आज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० पर्यंत पडलेला पाऊस

शहर भागात -: ३७.२६ मिमी

पूर्व उपनगर -: ६२.५० मिमी

पश्चिम उपनगर -:  ६९.४२ मिमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -