घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; झाड कोसळून झाला होता दुर्दैवी...

एपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; झाड कोसळून झाला होता दुर्दैवी अंत

Subscribe

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी (दि.२९) रात्री पावणे ९ वाजेच्या सुमारास झाड कोसळल्याची घटना घडली. त्यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा. अंबड, नाशिक) यांच्यासह चालकाचा मृत्यू झाला. दातीर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि.३०) नाशिकमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी दाखल आल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत एपीआय सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून, त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. ते छाजेड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. एक शेतकर्‍याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख तयार केलेल्या दातीर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -