घरमुंबईरश्मी शुक्लांनी भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले होते - राजेंद्र यड्रावकर

रश्मी शुक्लांनी भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले होते – राजेंद्र यड्रावकर

Subscribe

रश्मी शुक्लांसोबत एका माणसाने फोनवर संभाषण करुन दिले

मंत्र्यांच्या फोन टॅपींग प्रकरणामुळे राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपसोबत राहण्यासाठी धमकावले असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. यावर अपक्ष आमदार व आरोग्य राज्य मंत्री राजेद्र यड्रावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली होती असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर केलेल्या आरोपावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, होय हे खरे आहे की, माला या प्रकारची विचारणा झाली होती. परंतु त्याच वेळी मी सांगितले होते की, ज्या मतदार संघाने मला निवडून दिले आहे त्यांचा विचार घेतल्याशिवाय मी काही निर्णय घेणार नाही. नंतर मी माझ्या मतदार संघातील कार्यकर्ते, आणि जनतेचा मेळावा घेतला. त्या मेळाव्यात मी सर्वांना सांगितले की, आपण महाविकास आघाडी सरकारसोबत जायचे आणि त्या बाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

भाजप सरकारला आणि नेत्यांना पाठिंबा द्यावा अशी मागण होती. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना देण्यात आली होती. असे आरोग्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सांगितले आहे. तसेच राजेद्र यड्रावकर यांनी म्हटले आहे की, राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याशी थेट बोलणे झाले नव्हते त्यांच्याच एका माणसाने फोनवर संभाषण करुन दिले असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : आमदार यड्रावकरांना भाजपसोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी दबाव आणला; आव्हाडांचा गंभीर आरोप

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -