घरमनोरंजनअर्जुन चक्रवर्ती:''जर्नी ऑफ अन अनसंग चॅम्पियन'' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुन चक्रवर्ती:”जर्नी ऑफ अन अनसंग चॅम्पियन” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

हा बहुभाषिक चित्रपट १९८०च्या दशकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटूच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.

वेणू के.सी. दिग्दर्शित चित्रपट अर्जुन चक्रवर्ती ‘जर्नी ऑफ अन अनसंग चॅम्पियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बहुभाषिक चित्रपट १९८०च्या दशकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटूच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. एखाद्या खेळाडूच्या आयुष्यातील संघर्ष आणि विजय याची कच्ची प्रतिमा याचित्रपटाद्वारे सादर करण्यात येणार आहे. श्रीनी गुब्बाला निर्मित या चित्रपटाचा टिझर २४ मार्च रोजी ‘जागतिक कबड्डी दिनानिमित्त’ प्रदर्शित करण्यात आला. ‘अर्जुन चक्रवर्ती’ हा चित्रपट संपूर्ण भारतभर तेलगु, तमिळ, हिंदी, मल्याळम्, कन्नड इत्यादी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. अर्जुन चक्रवर्ती यांची कधीही न येकलेली कथा याचित्रपटाद्वारे सर्वांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

चित्रपटात भारतीय कबड्डी संघाच्या या यशस्वी कर्णधाराच्या जीवनाचे पैलू मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अभिनेता विजया रामा राजू ने यात अर्जुन चक्रवर्ती ही महत्त्वाची भूमिका साकरली आहे. तसेच सिजा रोज ही अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत दिसेल. यासोबतच या चित्रपटात १९६०-७० च्या दशकातील ग्रामीण आणि शहरी भारतीय भूप्रदेश यशस्वीरित्या पुनरुत्पादित करण्यात आला आहे. बालपणापासून मध्यम वयापर्यंतच्या नायकाचा जीवन प्रवास चित्रित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्याचे सहा वेगवेगळे लूक यामध्ये पाहायला मिळणार आहे. ‘अर्जुन चक्रवर्ती’ या चित्रपटाचे संगीत विघ्नेश बास्करन यांनी केले असून चित्रपटाचे संपादन प्रथम कुमार यांनी केले.


हे वाचा-‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ला नेटफ्लिक्सचा नकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -