घरमुंबईतळोजातून सर्वाधिक कैद्यांची सुटका

तळोजातून सर्वाधिक कैद्यांची सुटका

Subscribe

गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त

महात्मा गांधी यांची 150 वी जयंती मंगळवारी देशभर साजरी होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कैद्यांना दिलासा मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल ते कसे काय? तब्बल 100 कैद्यांची राज्याच्या विविध जेलमधून सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती गृह विभागाच्या जेल प्रशासनाकडून ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. त्यात तळोजा कारागृहातून सुटका होणार्‍या कैद्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
  राज्यातील 9 सेंट्रल जेल, वर्धा, धुळे कारागृह अशा एकूण 11 जेलमधून ५ ऑक्टोबर रोजी एकूण 100 कैद्यांची सुटका होणार असल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली आहे. त्यामध्ये तळोजा कारागृहातून 37 कैद्यांची सुटका, येरवडा मधून 24 तर नाशिक कारागृहात 10 कैदी सुटणार असून बाकीच्या कारागृहातून एक-दोन असे मिळून 100 कैदी तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
 महात्मा गांधी यांची 150 वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. त्यामुळे केंद्राच्या गृह विभागाकडून या जयंती निमित्त कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे. त्याचा राज्यातील 100 कैद्यांना लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे ही प्रकिया वर्षभर चालणार असून, 5 ऑक्टोबरला 100 कैद्यांची सुटका झाल्यानंतर 6 एप्रिल 2019 आणि 3 ऑक्टोबर 2019 ला काही कैद्यांची सुटका होणार असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला जेल प्रशासनाकडून मिळाली आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत आणि ज्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्या कैद्यांची सुटका होणार नाही. तसेच टाडा, मनी लॉडरिंग, भ्रष्टाचार प्रकरण, काळा पैसा तसेच अनेक गंभीर आरोपांखालील कैद्यांची सुटका करण्यात येणार नाही.
ज्यांच्यावर गंभीर गुन्हे नाहीत, ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे. तसेच ज्यांनी ६६ टक्के शिक्षा भोगली आहे अशांना हा लाभ मिळणार आहे. तसेच महिला व अपंग कैद्यांनी ५० टक्के शिक्षा भोगलेली असेल तर सुटका होणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -