घरमुंबईदादरच्या टिळक पुलासह शहरातील ५ उड्डाणपुलांची डागडुजी

दादरच्या टिळक पुलासह शहरातील ५ उड्डाणपुलांची डागडुजी

Subscribe

मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या दादरमधील टिळक पूल आणि करीरोडसह शहरातील पाच उड्डाणपुलांची डागडुजी महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे.

मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या दादरमधील टिळक पूल आणि करीरोडसह शहरातील पाच उड्डाणपुलांची डागडुजी महापालिकेच्यावतीने केली जाणार आहे. या पाच उड्डाणपुलांसह ३ पादचारी पुलांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. तब्ब्ल १७ कोटी रुपये खर्च करून ही दुरुस्ती केली जाणार असून टिळक रेल्वेपूल हे सर्वांत जुने आहे आणि ब्रिटीशांनीही महापालिकेला पत्र पाठवून याचे आयुर्मान संपुष्ठात आल्याचे कळवले आहे. त्यातच लोअर परळचे पूल तोडले असून त्यावर हा दुरुस्तीचा खर्च होणार असल्याने पुलांच्या नक्की डागडुजी होणार की मलमपट्टी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअर्स यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक 

मुंबईतील पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी तांत्रिक सल्लागार डी. डी. देसाईज असोशिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अँड ऍनालिसीस्ट यांची नेमणूक केल्यानंतर त्यांनी काही पुलांची दुरुस्ती सुचवली आहे. त्यानुसार शहरातील विद्मान उड्डाणपुलांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. महालक्ष्मी रेल्वेवरील उड्डाणपूल, करीरोड स्टेशन येथील रेल्वेवरील उड्डाणपूल, शीव स्टेशन येथील रेल्वेवरील उड्डाणपूल, शीव रुग्णालय येथील धारावी येथील रेल्वेवरील उड्डाणपूल आणि दादर टिळक पूल रेल्वेवरील उड्डाणपूल आदींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शिवाय दादर फूलमार्केट जवळील पादचारी पूल, माहिम फाटक येथील पादचारी पूल आणि धारावीतील धारावी-दादर नाल्यवरील पादचारी पूल आदींचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअर्स यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक केली असून यासाठी १६.९१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दादरच्या जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपूलाखाली सुशोभिकरण

दादर पूर्व येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपूलाखाली जागेचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अंतर्गत पदपथांसह विविध प्रकारच्या बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, प्रवेशद्वार तसेच उद्यान आदींच्या कामांचा समावेश आहे. ४.४४ कोटींचा खर्च करून हे सुशोभिकरण करण्यात येत आहे. स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेय घोले आणि एफ-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त केशव उबाळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नानंतरच प्रशासनाने याचे हा प्रस्ताव तयार करत यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे.

दहिसरचे स्कायवॉक तोडा

दहिसर पश्चिम येथे उभारण्यात आलेले स्कॉयवॉकच्या दुरुस्ती महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु याला आता स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. या स्कॉयवॉकचा वापर नागरिकांकडून केला जात नाही.उलट समाजकंटकांकडून त्याचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे हे स्कायवॉक तोडले जावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. त्यामुळे यासंदर्भात शिवसेना आमदार विलास पोतनीस आणि शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्यासह नागरिकांची आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत सोमवारी बैठक पार पडली. त्यामध्ये रहिवाशांनी हे स्कायवॉक निरुपयोगी असल्याचे सांगत यावर फेरीवाल्यांना बसवण्यात यावे, अशी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -