घरमुंबईपालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे होणार; महापौरांचे आश्वासन

पालिका कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे होणार; महापौरांचे आश्वासन

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सेवेचा पालिकेला लाभ व्हावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात येणार असल्याचे सूतोवाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्वातंत्र्यदिनी महापालिका मुख्यालयात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्या नंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबई पालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकारी येत्या काळात सेवानिवृत्त होणार आहेत. अशा अनुभवी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा पालिकेला लाभ व्हावा. शिवाय पालिकेची आर्थिक स्थिती पाहता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची गरज आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. सध्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे.

- Advertisement -

पालिकेचे सुमारे ९० हजार ते १ लाख पूर्णवेळ कर्मचारी आहेत. यामधील दोन हजारांहून अधिक कर्मचारी दरवर्षी निवृत्त होत असतात. हे सर्व कर्मचारी २००२ पूर्वी सेवेत रुजू झालेले आहेत. त्यामुळे त्यांना मासिक निवृत्तीवेतन द्यावे लागते. त्याचबरोबर निवृत्तीनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्ट्यांचे पैसे, ग्रॅच्युइटी तसेच इतर देणी असे मिळून किमान १५ ते २० लाख रुपये महापालिकेला ठरावीक कालावधीत द्यावे लागतात. तेवढ्याच प्रमाणात भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा असतो. त्यामुळे दरवर्षी मोठा आर्थिक बोजा येतो, शिवाय पदे रिक्त होत असल्याने कामाचा ताणही वाढतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -