घरमुंबईनिविदेला प्रतिसाद मिळेना, ‘रोरो’ची रडगाणे संपेना !

निविदेला प्रतिसाद मिळेना, ‘रोरो’ची रडगाणे संपेना !

Subscribe

सागरमाला उपक्रमांतर्गत जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुंबईत रोरो सेवा सुरु करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती, मात्र रोरो बोटी चालविण्याकरिता जागितिक निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही सेवा सुरू होण्याला २०१९ साल उजाडणार असे दिसत आहे.

सागरमाला उपक्रमांतर्गत जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुंबईत रोरो सेवा सुरु करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती, मात्र रोरो बोटी चालविण्याकरिता जागितिक निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही सेवा सुरू होण्याला २०१९ साल उजाडणार असे दिसत आहे. रो रोचे रडगाणे संपत नसल्यामुळे मुंबईकरांना तिची केवळ प्रतिक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही.

भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रोरो सेवा लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातून देत होते. भाऊचा धक्का ते मांडवा रोरो फेरी चालविण्यासाठी आता दुसरी निविदा मागितली आहे. पाहिली निविदा २०१७ मध्ये मागविण्यात आली होती. तेव्हासुद्धा या जागतिक निविदेला कोणत्याही कंपनीने प्रतिसाद न दिल्यामुळे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड) पुन्हा एकदा ही निविदा काढावी लागली आहे. त्यामुळे भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सुरु होणारी रोरो सेवा पुन्हा एकादा लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. मुंबई ते अलिबागपर्यंत पर्यटकांना स्वत:चे वाहन घेऊन येणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो-रो सेवा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून सुरू करण्यात येणार आहे. १३५ कोटी २९ लाख रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला जुलै २०१६ मध्ये प्रारंभ झाला. आतापर्यंत मांडवा आणि भाऊचा धक्का येथे लाटरोधक भिंत, तरंगता तराफा, जेट्टीचे काम पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान प्रवासी आणि वाहने घेऊन जाणारी दोन मोठी रोरो जहाजे सेवेत येतील. जहाज कंपनीकडून उपलब्ध करून त्यांच्याकडून चालवण्यात येणार आहे. प्रत्येक बोटीची किंमत ५० कोटींच्या घरत असून या दोन्ही बोटीची किंमत साधारणत: १०० कोटी असणार आहे. या रोरो बोटी विदेशातून आणाव्या लागणार आहेत. एका बोटीची क्षमता किमान 150 प्रवाशी तर 40 वाहने अशी असणार आहे. बोटीचे व्यवस्थापन-देखभाल खासगी अनुभवी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहे.अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचा एका वरिष्ठ अधिकार्‍याने महानगरला दिली आहे.

प्रकल्प फसण्याची चिन्हे
भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा प्रकल्पात जागतिक पातळीवरून गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा प्रकल्प फसण्याची चिन्हे दिसत आहेत. भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा प्रकल्प महाराष्ट्र सागरी मंडळासह सिडको आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवला जात आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडे नोडल एजन्सी म्हणून या प्रकल्पांची जबाबदारी आहे. त्यानुसार हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लागणार होता. मात्र आता हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

मंत्र्यांची फेकाफेक
रोरो सेवा एप्रिलमध्ये मुंबईकरांसाठी सुरू होणार होती, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून देत होते. मात्र एप्रिलपासून ही सेवा सुरू झाली नाही. उलट रो-रो सेवेचा डाव फसल्यामुळे नंतर मे महिन्यापर्यंत सुरू केली जाईल असे बोलले येत होते. एवढंच नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा रोरो सेवेबद्दल आपल्या भाषणातून सांगत होते. पण ही केवळ बोलाची कढीच ठरली आहे.

भाऊ धक्का ते मांडवा रो रो सेवाच्या फेर्‍या चालविण्यासाठी आम्ही निविदा मागवल्या आहेत. आम्हाला आशा आहे की लवकरच ही रोरो सेवा सुरु होईल.
विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -