घरमुंबई'मोदीजी, मनमोहन सिंगांचं ऐका'; सामनातून शिवसेनेनं सरकारला सुनावलं!

‘मोदीजी, मनमोहन सिंगांचं ऐका’; सामनातून शिवसेनेनं सरकारला सुनावलं!

Subscribe

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मौनीबाबा म्हणत त्यांच्यावर यथेच्छ टीका करणाऱ्या, त्यांची टिंगल टवाळी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून परखड बोल सुनावले आहेत.

सत्ताधारी असून देखील सत्ताधारी भाजपला सुनावण्यात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा अग्रलेख नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आता पुन्हा एकदा सामनाने परखड भाषेत केंद्र सरकारला म्हणजेच पर्यायाने भाजप आणि मोदींना सुनावले आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मनमोहन सिंगांना भाजपमधल्या कर्त्या-धर्त्यांनी मौनीबाबा म्हणत मस्करी केली होती, त्यांनीच खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेवरून सरकारचे उपटलेले कान कसे योग्यच आहेत, हे या अग्रलेखाने ठणकावून सांगितलं आहे. शिवाय, सरकारमधल्या मंत्र्यांना अवाजवी घोषणाबाजी करू नका असं जेव्हा मोदी सांगतात, तेव्हा याची सुरुवात कुणी केली? असा सवाल देखील सामनामधून विचारण्यात आला आहे.

‘मनमोहन सिंगांना बोलण्याचा अधिकार आहे’

मनमोहन सिंग यांनीच सर्वात आधी या आर्थिक संकटाची जाणीव ४ वर्षांपूर्वी करून दिली होती, असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘मोदींच्या कर्तबगारीवर आमचा विश्वास आहे. पण अर्थव्यवस्था आणि लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. या आर्थिक मंदीचं भाकित मनमोहन सिंगांनी ४ वर्षांपूर्वीच केलं होतं. पण त्यांची तेव्हा यथेच्छ टिंगल टवाळी करण्यात आली. मनमोहन सिंगांना अर्थशास्त्रातलं काहीच कळत नाही असं नव्या राज्यकर्त्यांचं म्हणणं होतं. पण ३५ वर्ष त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंध आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत त्यांना चुका दिसत असतील, तर त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार आहे’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

हे वाचलंत का? – नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली-रघुराम राजन

‘निर्मला सीतारमण यांची भिती वाटते!’

याशिवाय, विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर देखील निशाणा साधण्यात आला आहे. ‘मनमोहन सिंगांनी फक्त तोंडच उघडलं नाही, तर घणाघात केला आहे. नोटाबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरल्याचं मनमोहन सिंग सांगतात. विकासदर घसरला आहे. उत्पादन क्षेत्रातली वाढ घसरली आहे. लाखो लोकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. पण सरकारला हे भयावह वाटत नाही हे धक्कादायक आहे. निर्मला सीतारमण यांना आर्थिक मंदी कुठेच दिसत नाही. पण भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना त्या अमेरिका आणि चीनी अर्थव्यवस्थेशी करतात, तेव्हा भिती वाटते’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

घोषणाबाजीची सुरुवात कुणी केली?

दरम्यान, मनमोहन सिंगांची पाठराखण करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र अग्रलेखातून परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. ‘ही आर्थिक मंदी मानवनिर्मित आहे असं मनमोहन सिंग म्हणतात. त्यापाठोपाठ नितीन गडकरींनी देखील सरकार जिथे हात लावत आहे तिथे सत्यानाश होत असल्याचा भाला खुपसला होता. मोदींनी अलिकडेच मंत्र्यांना तंबी दिली की ज्या घोषणा पूर्ण करता येणार नाहीत, त्या घोषणाच करू नका. पण अशा मोठ्या घोषणांचे फटाके फोडायला सुरुवात कुणी केली? काश्मीरमध्ये विद्रोही रस्त्यावर उतरले तर त्यांना बंदुकांच्या जोरावर रोखता येईल. पण मंदीमुळे बेरोजगारी उसळून लोकं भूक भूक करत रस्त्यावर उतरले, तर त्यांनाही गोळ्या घालणार का?’ असा थेट सवालच मोदींना विचारण्यात आला आहे. ‘आर्थिक मंदीचे राजकारण करू नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असं मनमोहन सिंग या शहाण्या मानसाने आवाहन केलं आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्रीय हित आहे’, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

पाहा मनमोहन सिंग यांनी नक्की काय सांगितलं!

मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी

नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांची योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे देशात आर्थिक मंदी – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -