घरदेश-विदेशनोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली - रघुराम राजन

नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली – रघुराम राजन

Subscribe

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी पुन्हा नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर जीएसटी ही चांगली संकल्पना असल्याचे ते म्हटले आहेत.

नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था डगमगली असल्याचे वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बॅंकाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ज्यावेळी जागतिक अर्थव्यवस्था वाढत होती, त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मंदावली आणि त्याचे कारण आहे नोटबंदी. रघुराम राजन यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शक्तिकांत दास यांची नियुक्ती सरकारने रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी केली. नोटबंधीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली, असे वक्तव्य त्यांनी याअगोदरही गव्हर्नरपदी असताना केले होते.

नेमकं काय म्हणाले राजन?

रघुराम राजन म्हणाले की, २०१७ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत होती. परंतु, नेमकं त्याचवेळी नोटबंदीमुळे आपली अर्थव्यवस्था मंदावली. एकंदरीत माझा विचार करता नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आणि हेच खरं असल्याचे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. त्याचबरोबर ही मंदावलेली अर्थव्यवस्था उभी होत असतानाच तिला जीएसटीचा जबरदस्त फटका बसल्याचे राजन म्हणाले. त्याचबरोबर मी जीएसटीच्या विरोधात आहे असा आरोप करण्याअगोदर मी सांगू इच्छितो की दीर्घकालीन विचार केला तर जीएसटी ही चांगली संकल्पना आहे, असे राजन म्हणाले. सरकारकडून नोटबंदीविषयी आपले मत विचारण्यात आले तेव्हा आपण ही कल्पना वाईट असल्याचे सांगितले होते, असेही राजन म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – महेश कुमार जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

जीएसटीविषयी बोलताना रघुराम राजन म्हणाले की, ही यंत्रणा आणखी चांगल्या प्रकारे राबवता आली असती. त्याचबरोबर आर्थिक घोटाळ्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आपण गव्हर्नर असताना घोटाळेबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तपास संस्थांच्या संपर्कात राहायचे होते. त्याचबरोबर हाय प्रोफाइल केसेसची यादी आपण पंतप्रधान कार्यालयात दिली असल्याची माहिती राजन यांनी दिली. यापैकी एक दोघांवरी तरी कारवाई व्हावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवाय, या केसेसचे पुढे काय झाले? याविषयी आपल्याला कल्पना नसल्याचे राजन यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – मनमोहन सिंहही म्हणतात, ‘तर गव्हर्नरने राजीनामा द्यावा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -