घरमुंबईरेल्वे पूलाजवळ सक्शन पंपातून रेती उत्खनन

रेल्वे पूलाजवळ सक्शन पंपातून रेती उत्खनन

Subscribe

रेल्वे पूलाला धोका

नायगाव आणि भाईंदरला जोडणार्‍या रेल्वे पूलाजवळ रात्रीच्या वेळी सक्शन पंप लावून बेकायदा रेती उत्खनन होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या चोरट्या रेती उपशामुळे रेल्वे पूलाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवरील नायगाव ते भाईंदर रेल्वे पूलाजवळ वसई खाडीतून सध्या सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा केला जात आहे. अगदी मध्यरात्री सक्शन पंप लावून रेती उपसा केला जातो. दररोज रात्री एकावेळी सात ते आठ सक्शन पंप रेती उपसा करताना दिसतात. ही रेती रात्रीच बोटीतून नायगाव आणि भाईंदरच्या किनार्‍याला नेऊन तिथून ट्रकमधून बांधकामासाठी विकली जात आहे.

- Advertisement -

नायगावमधील काही गावकर्‍यांनी सक्शन पंपातून रेती काढणार्‍यांना विरोध केला असता त्याठिकाणी असलेल्या लोकांनी दादागिरी करून गावकर्‍यांना परतवून लावले. धक्कादायक बाब म्हणजे वसई खाडीवरील पूलावर रेल्वे आणि आरपीएफ पोलिसांची गस्त असते. असे असताना रात्री बिनधास्तपणे तेही सक्शन पंप लावून रेती उपसा केला जात असताना कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते.

दरम्यान, वसई खाडीत रेती उपसा करण्यास मनाई आहे. असे असतानाही सक्शन पंपाद्वारे रेती उपसा केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेती उपसा होणारी जागा रेल्वे पूलापासून अगदी जवळच आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात होत असलेल्या रेती उपशामुळे पूलाला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -