घरमुंबईजुहू येथे पार पडला 'सेव्‍ह द बीच' हा खास उपक्रम!

जुहू येथे पार पडला ‘सेव्‍ह द बीच’ हा खास उपक्रम!

Subscribe

समुद्रकिनाऱ्यांवर होणारा कचरा आणि कचऱ्याची विल्‍हेवाट यासंबंधीच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी एक दीर्घकालीन उपाय अंमलात आणला जात आहे. यातूनच सेव्‍ह द बीच उपक्रमासाठी मुंबईतील जुहू समुद्रकिना-यावर १०००हून अधिक मुंबईकर एकत्र आले. यावेळी समुद्रकिनारा स्‍वच्‍छतेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासोबतच या उपक्रमामध्‍ये सक्रियपणे सहभाग घेण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. ‘लोक आणि ग्रह साठी पाणी खाली जीवन’ या थीमअंतर्गत जागतिक वन्‍यजीव दिनी आयोजित करण्‍यात आलेल्‍या या उपक्रमाचा यावेळी विविध समुद्री जातींचे संवर्धन करण्‍यावर फोकस होता. या उपक्रम जागतिक बीअर ब्रॅण्‍ड कोरोना, अर्थ डे नेटवर्क, जुहू – सोल ऑफ मुंबई सिटी, फॉरवर्ड ६९, मिशन ग्रीन मुंबई आणि बृहन्‍मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) यांच्‍यामधील बहु-संस्‍थीय सहयोग आहे. गेल्‍या वर्षी जागतिक पर्यावरण दिनी हा उपक्रम सुरू करण्‍यात आला. या उपक्रमांतर्गत जुहू समुद्रकिना-याचे जतन व संवर्धन करण्‍यासाठी ५,००० हून अधिक नागरिक एकत्र आले.

‘द कॅच’ मुख्य आकर्षण

बॉलिवूड सेलिब्रिटी रवीना टंडनसह स्‍थानिक नगरसेविका श्रीम. रेणू हंसराज यांच्‍याहस्‍ते जुहू समुद्रकिनारा येथे अनोख्‍या कलाकृतीची स्‍थापना करण्‍यात आली. यासाठी माननीय आमदार श्री. अमित साटम यांचे साह्य व मार्गदर्शन मिळाले. मुंबईतील २५ हौशी कारागीरांनी तयार केलेल्‍या ‘द कॅच’ या कलाकृतीचा आकार माश्‍याप्रमाणे आहे. तसेच ही कलाकृती मुंबईच्‍या समुद्रकिना-यांवर सापडलेल्‍या ४,००० हून अधिक प्‍लास्टिक बाटल्‍या आणि इतर अवशिष्‍टांपासून बनवण्‍यात आली आहे. ‘द कॅच’ कलाकृती समुद्राच्‍या पाण्‍यामध्‍ये प्‍लास्टिक कचरा टाकल्‍याने समुद्रीजीवांना असलेल्‍या धोक्‍याबाबत सांगते. कलाकृतीची स्‍थापना, समुद्रकिनारा स्‍वच्‍छता व जागरूकता मोहीमांव्‍यतिरिक्‍त प्रमुख सहभागींसह स्‍वयंसवेक समूहांचा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला.

- Advertisement -

आम्‍हाला आनंद होत आहे की, आम्‍ही ‘सेव्‍ह द बीच’ मोहीमेसह या थीमवर फोकस केला आहे. लोकांनी वाळूमध्‍ये असणा-या, लाटांसोबत किना-यावरील वाळूमध्‍ये येणा-या व वाळूंवर वलयांकित वर्तुळे करणा-या सुंदर समुद्रीजीवांचा शोध घेण्‍यासाठी सुप्रसिद्ध निसर्गवादींच्‍या नेतृत्‍वांतर्गत ‘डिस्‍कव्‍हर द लिव्हिंग बीच’ पदयात्रा देखील आहेत.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -