घरमुंबईमुंबईत दुसरे अवयवदान यशस्वी; तिघांना मिळाले जीवदान

मुंबईत दुसरे अवयवदान यशस्वी; तिघांना मिळाले जीवदान

Subscribe

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० हे वर्ष अवयवदानासाठी निराशाजनक ठरले होते. मात्र २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात अवयवदान करण्यात आल्याने अनेकांना जीवदान मिळाले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० हे वर्ष अवयवदानासाठी निराशाजनक ठरले होते. मात्र २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणात अवयवदान करण्यात आल्याने अनेकांना जीवदान मिळाले. २०२२ या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अवघ्या काही दिवसांत दुसर्‍यांदा अवयवदान प्रक्रिया पार पडली. दुसर्‍या अवयवदानामध्ये तीन जणांना जीवदान मिळाले आहे.

संजय मनोहरलाल सिसोदिया (५२) यांच्या मेदूतील रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेल्या ब्लॉकेजमुळे त्यांना एक झटका आला. त्यामुळे २२ जानेवारीला त्यांना मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने त्यांच्या विविध तपासण्या करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचा मेंदूमृत झाला. यासंदर्भातील माहिती सिसोदिया यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना अवयवदानाची माहिती देण्यात आली. सिसोदिया कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार सिसोदिया यांचे एक मूत्रपिंड रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आले. तर दुसरे मूत्रपिंड नानावटी रुग्णालय आणि यकृत हे कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आल्याची माहिती सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाचे न्यूरो सायन्स विभागाचे संचालक डॉ. अरुण शहा यांनी दिली. सिसोदिया कुटुंबियांच्या या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आता सुधारणा होत असून, अवदानाच्या प्रक्रियेमध्ये वाढ होत असल्याचे झेडटीसीसीचे जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शाह यांनी सांगितले. फार कमी वयामध्ये आमच्या वडिलांचे निधन झाले हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. परंतु आम्ही उदात्तपणे आमच्या वडिलांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. आमच्या या निर्णयाने अनेकांना प्रोत्साहन मिळेल आणि तेसुद्धा अवयवदानासाठी पुढे येऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतील, अशी भावना सिसोदिया यांची मुले हर्ष व यश यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -