घरमुंबईविक्रोळीत म्हाडाच्या एका फ्लॅटची दोघांना विक्री

विक्रोळीत म्हाडाच्या एका फ्लॅटची दोघांना विक्री

Subscribe

38 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघे अटकेत , म्हाडा फ्लॅटची आरटीआयद्वारे माहिती काढून फसवणूक करायचे

विक्रोळीतील म्हाडाच्या एका फ्लॅटची दोन व्यक्तींना विक्री करून सुमारे 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अरविंद रतनलाल खेडसिया आणि हरिष बाबूलाल जैन अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक कोर्टाने 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह ड्रग्ज तस्करीच्या काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी कांदिवली आणि मुंबई सेंट्रल येथेही म्हाडाच्या फ्लॅटची चौघांना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार बेस्टमध्ये कामाला आहे. भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याने त्यांनी स्वत:चा फ्लॅट खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले होते.

तीन वर्षांपूर्वी त्यांची दोन्ही आरोपींशी ओळख झाली होती. आपली म्हाडामध्ये ओळख आहे, त्यांना स्वस्तात म्हाडा एक फ्लॅट मिळवून देतो, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी म्हाडाचा फ्लॅट खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना या दोघांनी विक्रोळीतील कन्नमवार नगर दोन, म्हाडा नवीन संक्रमण शिबिरातील एक फ्लॅट दाखविला होता. याच फ्लॅटसाठी त्यांच्याकडून 23 लाख रुपये घेतले. काही महिन्यांनी त्यांना म्हाडाचा ताबा देण्यात आला होता. मात्र ताबा मिळताच त्यांना हाच फ्लॅट या दोघांनी अन्य एका महिलेस विकला असून तिच्याकडून पंधरा लाख रुपये घेतल्याचे समजले. या दोघांनी दोन्ही आरोपींनी फसवणूक केल्याने त्यांची विक्रोळी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याचा प्रॉपर्टी सेलचे अधिकारी समांतर तपास करीत होते.

- Advertisement -

हा तपास सुरू असतानाच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत हरिषविरुद्ध अशाच फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल असून त्याला पोलिसांनी अटक केली होती. अरविंदविरुद्ध पुण्यात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ते दोघेही आरटीआयद्वारे म्हाडाच्या फ्लॅटसंदर्भात माहिती जाणून घेत, त्यानंतर किती लोकांना म्हाडाचा फ्लॅट वितरीत झाला आहे, किती फ्लॅटचा अद्याप कोणी कोणी ताबा घेतला नाही याची माहिती काढून घेत होते. अशा फ्लॅटचे स्वतःच्या नावाने बोगस दस्तावेज बनवून तो फ्लॅट त्यांचाच असल्याचे सांगून ते लोकांना गंडा घालत होते.

विक्रोळी येथे त्यांनी एका बेस्ट अधिकार्‍यासह एका महिलेकडून स्वतःचा फ्लॅट सांगून 38 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. अशाच प्रकारे त्यांनी कांदिवली आणि मुंबई सेंट्रल येथे प्रत्येक दोन फ्लॅटची चार व्यक्तींना विक्री करून फसवणूक केली आहे. या दोन्ही गुन्ह्यांत ते पाहिजे आरोपी आहेत. हरिष हा अरविंदच्या मदतीने बँकेत चेक टाकत होता. त्यासाठी त्याला ठरावीक रकमेचे कमिशन मिळत होते. त्यासाठी त्याने बँकेत बोगस दस्तावेज बनवून खाते उघडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या अटकेने अशाच अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -