घरमुंबईशेअर बाजार उसळला; सेन्सेक्स २५० तर निफ्टी ११ हजार ६७० अंकांवर

शेअर बाजार उसळला; सेन्सेक्स २५० तर निफ्टी ११ हजार ६७० अंकांवर

Subscribe

भारतीय शेअर बाजार आज, गुरुवारी सकाळी उसळी मारत असल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स २५० पॉईंटवर आले असून निफ्टी ही ११ हजार ६७० अंकांवर आले आहे.

भारतीय शेअर बाजार आज, गुरुवारी सकाळी उसळी मारत असल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स २५० पॉईंटवर आले असून निफ्टी ही ११ हजार ६७० अंकांवर आले आहे. सध्या देशातील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींचे निकाल येत आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचा निकाल आज लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील ही उसळी महत्त्वाची मानली जात आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आज सकाळी सेन्सेक्स १६४.१८ अंकांनी वधारला असून ३९,२२३.०१ अंकांवर उघडला. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांवर सर्वाधिक ३९,३२७.१५ अंकांपर्यंत पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही निफ्टी आज ५७.५५ अंकांनी उसळला असून ११,६६१.६५ वर त्याची सुरुवात झाली.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईचा कौल कुणाला? शिवसेना-भाजप आपल्या जागा राखणार का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -