घरमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election Result 2019 : मोदींची सभा फेल; उदयनराजे भोसलेंचा पराभव...

Maharashtra Assembly Election Result 2019 : मोदींची सभा फेल; उदयनराजे भोसलेंचा पराभव निश्चित!

Subscribe

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत माजी खासदार आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्यातली विधानसभा निवडणूक एका बाजूला आणि साताऱ्याची पोटनिवडणूक दुसऱ्या बाजूला अशी थेट तुलना केली जात होती. मात्र, या प्रचंड हाईप करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. ११व्या फेरीनंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले तब्बल ८१ हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघ आणि तिथल्या मतदारांचा कौल पाहाता उरलेल्या फेऱ्यांमध्ये उदयनराजे भोसलेंना हा फरक भरून काढणं अशक्यप्राय दिसत असल्यामुळे त्यांचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.


Maharashtra Assembly Election Result 2019 : प्रणिती शिंदे पिछाडीवर!

साताऱ्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर साताऱ्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्याशिवाय उरलेल्या २ मतदारसंघांपैकी पाटण या मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना नेहमीच पाठिंबा मिळत आला आहे. त्यामुळे उरलेल्या एका मतदारसंघातून उदयनराजे पिछाडीवर असलेला फरक भरून निघणं अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळेच उदयनराजे भोसलेंचा पराभव निश्चित मानला जात आहे. दरम्यान, या कौलानंतर उदयनराजेंच्या पराभवासंदर्भातले मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

- Advertisement -

Udayanraje Bhosale Memes

शरद पवारांची पावसातली सभा पावली!

दरम्यान, शरद पवारांनी साताऱ्यामध्ये भर पावसात घेतलेली सभा राष्ट्रवादी काँग्रेसला पावली असल्याचं बोललं जात आहे. या सभेवर सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. पावसात भिजत स्टेजवर बोलणारी शरद पवारांची छबी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक मत तयार करत असल्याचं दिसून आलं होतं. त्याचा मोठा फायदा पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या सभेनंतर, ‘पाऊस पडल्यावर माणूस भिजणारच’, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती. पण आता उदयनराजेंना या निकालातून मोठा फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.

- Advertisement -

राज्यसभेवर जाण्याची तयारी?

भाजपध्ये प्रवेश घेतला, तेव्हाच उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा प्रवेशाची तजवीज करून ठेवली होती, असं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत जर पराभव झाला, तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवायचं भाजपनं उदयनराजेंना कबूल केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळेच ते राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -