घरमुंबईपश्चिम रेल्वे विस्कळीत; खार स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग

पश्चिम रेल्वे विस्कळीत; खार स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग

Subscribe

खार स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बोरीवलीकडे जाणारी फाल्ट लोकल सेवा ठप्प झाली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. खार स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बोरीवलीकडे जाणारी फाल्ट लोकल सेवा ठप्प झाली आहे. लोकलमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या लोकलमधून उतरवण्यात आले आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे कामावरुन सुटलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

अशी घडली घटना

खार रोड स्थानकावरील पादचारी पुलावरून ओव्हरहेड वायरवर अज्ञाताकडून कपडा टाकण्यात आला होता. त्यामुळे लोकलवरील पेंटाग्राफ आणि ओएचइ यांचा संपर्क आल्यामुळे शॉट सर्किट झाला. त्यामुळे आग लागली. लोकमधील घाबरलेल्या प्रवाशांनी ताबडतोब लोकल खाली केली. पेंटाग्राफला आग लागल्यामुळे फास्ट लोकल फेऱ्या थांबवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. या घटनेनंतर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुमारे २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -