घरदेश-विदेशतिने विमान अपघातात मृत्यू झालेल्या जोडीदाराशी केले लग्न

तिने विमान अपघातात मृत्यू झालेल्या जोडीदाराशी केले लग्न

Subscribe

२९ ऑक्टोबरला विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये इंटन या तरुणीच्या होणाऱ्या पतीचाही मृत्यू झाला.

इंडिनेशियाचे एक विमान २९ ऑक्टोबरला समुद्रात कोसळले होते. या अपघातात १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृत्यूमुखी झालेल्या प्रवाशांमध्ये इंटन स्यारी या तरुणीचा होणारा पती रियो नंदा प्रतामाचा देखील मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ११ नोव्हेंबरला त्यांचे दोघांचे लग्न ठरले होते. दोघांच्या घरामध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरु होती. परंतु, विमान अपघात झाल्याने प्रतामा घरी पोहचू शकला नाही. अखेर इंटनने ११ नोव्हेंबरला लग्न ठरलेल्या ठिकाणी जाऊन अपघातात मृत्यमुखी झालेल्या प्रतामासोबत लग्न केले आहे.

हेही वाचा – इंडोनेशिया विमान दुर्घटना : ‘त्या’ विमानाचा पायलट भारतीय

- Advertisement -

प्रतामाची शेवटची इच्छा केली पूर्ण

विमानात बसण्यापूर्वी प्रतामाचे इंटनशी फोनवर बोलणं झाले होते. यामध्ये मस्करीत प्रतामा बोलून गेला होता की, घरी पोहचलो नाही तरी माझ्याशीच लग्न कर. मी पसंत केलेलेच कपडे परिधान कर. मेकअप करुन पांढरे गुलाब मांगव आणि मला फोटो सेंड कर. त्यानंतर १३ मिनिटांनीच विमान क्रॅश झाले आणि त्यात प्रतामाचा मृत्यू झाला. इंटनने प्रतामाची हे बोलणे वास्तवात करुन दाखवलं आहे. इंटनने ११ नोव्हेंबरला ठरलेल्या ठिकाणी जाऊन प्रतामाशी लग्न केले. या दिवशी इंटन प्रतामाने निवडलेले पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले. त्यानंतर तिने आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, ‘मी प्रतामाची शेवटची इच्छा पूर्ण करु इच्छिते. प्रतामा माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही १३ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत’. प्रतामा, मी दु:ख व्यक्त करु शकत नाही. मी नेहमी तुझ्यासाठी हसत राहील, मी शूर बनण्याचा प्रयत्न करेल, असेही ती म्हणाली.

- Advertisement -

हेही वाचा – इंडोनेशिया विमान अपघात; बिघडलेल्या एअरस्पीड इंडीकेटरसह झाले उड्डाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -