घरमुंबईम्हणून 'त्यांनी' घरातच सुरु केले सेक्स रॅकेट!

म्हणून ‘त्यांनी’ घरातच सुरु केले सेक्स रॅकेट!

Subscribe

मुंबईतल्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने पैशांसाठी चक्क घरातच वैश्या व्यवसाय सुरु केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी हरिश करमसी सोता (७२) आणि देवीबेन सोता (६५) या वयोवद्ध दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत, दोघेही पोलीस कोठडीत आहेत

आजकाल सगळ्यांनाच झटपट पैसा कमावण्याचे वेड लागले आहे. काम नसताना आपल्याला आयते पैसै मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईतल्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याने पैशांसाठी चक्क घरातच वैश्या व्यवसाय सुरु केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी हरीश करमसी सोता (७२) आणि देवीबेन सोता (६५) या वयोवद्ध दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. हरीश करमसी सोता हे एका बड्या कंपनीतून निवृत्त झालेले आहेत तर देवीबेन सोता ह्या गृहिणी आहेत. उतारवयात पैशांची कमतरता भासत असल्यामुळे घरखर्चाला पैसै मिळणेही कठीण झाले होते. म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.

असे सुरू झाले सेक्स रॅकेट!

मुलुंड पश्चिमेकडील अजंता इमारतीतील फ्लॅट क्रमांक १६ मध्ये हे दाम्पत्य राहते. गरीबीची कधीही झळ न बसलेल्या सोता कुटुंबियाला अशा परीस्थितीत दिवस काढणे कठीण झाले होते. अश्या वेळी देविबेन सोता या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींच्या संपर्कात आल्या. स्वत:च्या घरात वेश्या व्यवसाय सुरु करायला जागा दिल्यास ज्यादाचे पैसे मिळतील या लालसेपोटी त्यांनी चक्क घरातच हा धंदा सुरु केला.

- Advertisement -

धंदा सुरु झाल्यापासून सोता दाम्पत्याच्या घरात येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरी छापा टाकला आणि एका २२ वर्षांच्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सोता कुंटुंबिय सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचाही पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -