घरदेश-विदेशबीअरच्या १० लाख बाटल्यांपासून बनवलेले देऊळ!

बीअरच्या १० लाख बाटल्यांपासून बनवलेले देऊळ!

Subscribe

साधारण ३० वर्षांपूर्वी या वैशिष्ट्यपूर्ण देऊळाची उभारणी झाली असून, आज हे 'बीअर बॉटल' देऊळ जगभरातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलं आहे.

मंदिर किंवा देऊळ हे पवित्र धर्मस्थान मानलं जातं. मासांहार किंवा मद्यपान अशा गोष्टी देवळामध्ये करण्याचा साधा विचारही कुणी करु शकत नाही. मात्र, जगाच्या पाठीवर असं एक देऊळ आहे जे चक्क बीअरच्या रिकाम्या बाटल्यांपासून उभारण्यात आलं आहे. एक-दोन नाही तर तब्बल १० लाख बीअर बॉटल्सचा वापर करुन हे देऊळ उभारण्यात आलं आहे. हे खास देऊळ आहे थायलंडमधील सिस्केट प्रांतात. सिस्केट प्रांतातील भिक्षूंनी बीअरच्या दहा लाख बाटल्यांच्या साहाय्याने हे भव्य देऊळ उभारलं आहे. ‘वाट प महा चेदी खेवफनाम’ असं या देवळाचं नाव असून, देवळाचा एक अन एक भाग बीअरच्या रिकाम्या बाटल्यांनीच भरण्यात आला आहे. हिरव्या आणि राखाडी रंगाच्या बीअर बॉटल्सचं हे देऊळ जगभरातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलं आहे.

फोटो सोर्स- Kawishblog

देवळाला ऐतिहासिक वारसा

हे वैशिष्ट्यपूर्ण देऊळ १९८४ साली अर्थात सुमारे ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलं आहे. बाहेरुन पाहता हे संपूर्ण देऊळ काचेचं आहे याची कल्पनाही येत नाही. मात्र, प्रत्यक्षात ते पूर्णत: काचेचं बनलं असून या काचा बीअर बाटल्यांच्या आहेत. यामागे एक अख्यायिका सांगितली जाते. असं म्हणतात, की ३० वर्षांपूर्वी इथल्या समुद्र किनाऱ्यांवर होणाऱ्या बीअर बाटल्यांचा कचऱ्यामुळे, इथले बौद्ध भिक्षु हैराण झाले होते. या बाटल्यांची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करताना त्यांना ही अनोखी कल्पना सुचली. बीअरच्या सगळ्या बाटल्या एकत्र जमवून आणि त्या रिसायकल करून त्याचा वापर मंदिर उभारणीसाठी केला गेला. अनेक महिन्यांच्या यशस्वी प्रयत्नांनतर भिक्षुंच्या कल्पनेतलं हे आगळं-वेगळं देऊळ प्रत्यक्षात उभं राहिलं.

- Advertisement -
thailand beer bottle temple
फोटो सोर्स- Blogzone

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -