घरदेश-विदेशShah Rukh Khan : समीर वानखेडेंसोबत शाहरुखला आरोपी करा; हायकोर्टात याचिका

Shah Rukh Khan : समीर वानखेडेंसोबत शाहरुखला आरोपी करा; हायकोर्टात याचिका

Subscribe

 

मुंबईः आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विरोधात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात Shah Rukh Khan अभिनेता शाहरुख खानलाही आरोपी करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अंमली पदार्थ प्रकरणातून आर्यन खानची सुटका करण्यासाठी समीर वानखेडेने २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा सीबीआयचा आरोप आहे. शाहरुखने ही लाच दिल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

- Advertisement -

Adv राशीद खानने ही याचिका केली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लाच देणारा ही गुन्हेगार असतो. हा आरोप सिद्ध झाल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतुद आहे. वानखेडेने पंच के. पी. गोसावी मार्फत शाहरुखकडे लाच मागितली होती. शाहरुखने लाच दिल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दावा आहे. त्यामुळे शाहरुखला या गुन्ह्यात आरोपी करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

हेही वाचाःधक्कादायक : जुहू समुद्रात ६ जण बुडाले; दोघांना बाहेर काढले, चौघांचा शोध सुरु

- Advertisement -

समीर वानखेडेंवरील गुन्हा

cruise drugs प्रकरणातून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी तत्कालीन NCB अधिकारी समीर वानखेडेंनी २५ कोटींची लाच मागितली असा आरोप करत CBI ने गुन्हा नोंदवला. तशी तक्रार NCB ने सीबीआयकडे केली होती. त्यानंतर समीर वानखेडेंच्या घरावरही छापा टाकण्यात आला. CBI ने चौकशीसाठी समीर वानखेडेंना समन्सही जारी केले. याविरोधात समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्लीत सीबीआयने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करु नये. सीबीआय तपासाला स्थगिती द्यावी. मला अटक न करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी समीर वानखेडेने याचिकेत केली आहे. या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, CBI, NCB व महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

वानखेडेंचा NCB वर आरोप

कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यामुळे हे प्रकरणी खूप चर्चेत आले होते. त्यावेळी अनेक कारणांमुळे वानखेडे यांच्यावर खंडणी व लाचखोरीचे गंभीर आरोप केले. त्यानंतर नवी दिल्लीतील एनसीबी मुख्यालयातून एसआयटीची स्थापना करण्यात आली. जातीय छळाबाबत मी ऑगस्ट-२०२२मध्ये एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्यांचा माझ्यावर व्यक्तिगत राग होता आणि म्हणूनच एसआयटी स्थापन करून सूडबुद्धीने माझ्याविरोधात अहवाल तयार करण्यात आला. माझ्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासाबाबत व माझ्या वर्तणुकीबाबत संशय निर्माण करून आर्यनला क्लीन चीट देण्यात आली असल्याचा दावा वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. या प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावी याने आर्यनसोबत जो सेल्फी फोटो घेतला त्याला एनसीबीची संमती नव्हती. परंतु आर्यन हा सेलिब्रिटी असल्यामुळे अनेक जण त्याच्यासोबत फोटो घेत होते, असे स्पष्टीकरणह समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -