घरमुंबईशीळ रस्ता अखेर चकाचक

शीळ रस्ता अखेर चकाचक

Subscribe

ठाणे मुंबईकडे जाणार्‍या शीळ फाटा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.एमएसआरडीसीकडून रस्त्याच्या काम पूर्ण करण्यात आले असून हा रस्ता चकाचक झाला आहे. खड्डे बुजविण्याच्या कामाला महिनाभरात कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन एमएसआरडीसीए, एमएमआरडीए, वाहतूक शाखेने दिले होते. अखेर रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अधिकर्‍यांसह कल्याण फाटा आणि शीळफटा येथे पाहाणी दौरा करत. वाहतूक कोंडी कधी सोडवली जाईल याचा आढावा घेतला होता.यावेळी कल्याण-शिळं-महापे(टेकडीवरील) रस्त्याची पाहणी केली होती.याच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याचे दिसून आले होते. महिनाभरात या कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन एमएमआरडीएच्या अधिका-यांनी दिले होते. त्यानुसार एमएमआरडीएने रस्त्याच्या कामाला सुरुवात करीत रस्त्यावरील खड्र्डे बुजविण्यात आले आहेत.

- Advertisement -

या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करण्यासाठी सुमारे अर्धा तास लागत होता आणि खड्डे चुकवत प्रवास करावा लागत होता. मात्र रस्त्याचे काम झाल्याने आता हा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. तसेच “शॉर्ट टर्म” आणि “लाँग टर्म” पद्धतीने उपाय योजना केल्या जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे उपयुक्त अमित काळे यांनी सांगितले होते.त्याच धर्तीवर शॉर्ट टर्म उपाय-योजना करण्यास सुरुवात झाली असून या योजनेतील हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचप्रमाणे जंक्शन मोठे करणे,बॅरिगेट उभारणे काही ठिकाणी असलेले डिव्हायडर बंद करणे अशी कामे करत असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. लाँग टर्म उपाययोजनेमध्ये उड्डाणपूल उभारणे, अंडरपास तयार करणे आणि रस्ते मोठे करणे, असे एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. तसेच शिळफाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांनी एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी साडविण्यासाठी आजी-माजी आमदार कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -