घरमुंबईशिक्षक भारतीचे आंदोलन यशस्वी; मुंबईतील शिक्षकांचे पगार रवाना

शिक्षक भारतीचे आंदोलन यशस्वी; मुंबईतील शिक्षकांचे पगार रवाना

Subscribe

मुंबईतील शिक्षकांचे रखडवलेले पगार शिक्षक भारतीने निदर्शनाचा दणका देताच ताबडतोबीने वितरीत करण्यास सुरुवात झाली.

जानेवारी १, २०१९ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाचा मार्च पेड इन एप्रिलचा पगार ८ तारीख आली तरी झाला नाही. शिक्षक व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या हट्टामुळे गुढीपाडव्याचा सण पगाराविना साजरा करावा लागला. मार्च पेड इन एप्रिलचा पगार उणे बिलातून द्यावा लागतो. मात्र त्याबाबत काहीच हालचाल शिक्षण विभागाने केली नाही. पगाराची बिले सुद्धा तब्बल १५ दिवस उशिराने ट्रेझरीकडे पाठवण्यात आली. खुद्द पे ऍण्ड अकाऊंट डिपार्टमेंटनेच याबाबत माहिती उघड केली तेव्हा पगार जाणीवपूर्वक उशिरा करण्यात आल्याचे उघडकीला आले. पे  ऍण्ड अकाऊंट डिपार्टमेंटचे प्रमुख राजे घाटगे यांनी स्वतः हस्तक्षेप केल्यानंतर शिक्षकांचे पगार ईसीएस झाल्याची माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

मुंबईतील शिक्षकांचे रखडवलेले पगार शिक्षक भारतीने निदर्शनाचा दणका देताच ताबडतोबीने वितरीत करायला सुरवात झाली. उद्या दुपार पर्यंत मुंबईतील सर्व शिक्षकांचे पगार मिळालेले असतील, असे शिक्षण उपसंचालकांनी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

- Advertisement -

आज मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयावर झालेल्या निदर्शनेच्या वेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाह प्रकाश शेळके, उपाध्यक्षा डॉमनिका डाबरे, महिला अध्यक्षा संगिता पाटील, ज्युनि. कॉलेजचे अध्यक्ष आर. बी. पाटील, मुंबई अध्यक्ष शरद गिरमकर, ईश्वर आव्हाड, कल्पना शेंडे, चंद्रभान लांडे, शिवाजी आव्हाड, मच्छिंद्र खरात, अशोक शिंदे, अनंत सोलकर, मीना जैसवाल, संजू परेरा, डिसोजा सर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -