घरक्रीडालोकेश राहुल चमकला; चौकार मारून सामना खिशात

लोकेश राहुल चमकला; चौकार मारून सामना खिशात

Subscribe

पंजाबने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा हाच निर्णय योग्य ठरला. पंजाबने आपले ६ गडी राखत हैदराबादचा पराभव केला.

पंजाब आणि हैदराबाद यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाबच्या लोकेश राहुलने ऐनवेळी मारलेल्या चौकारामुळे ६ गडी राखत पंजाबने हैदराबादवर मात केली आहे. हैदराबादने पंजाबला १५१ धावांचे आव्हान दिले होते. लोकेश राहुलने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे पंजाबने हा सामना जिंकला. लोकेश राहुलने नाबाद ७५ धावा केल्या. या सामन्यात मयांक अग्रवालनेही राहुलला चांगली साथ दिली. त्यानेही अर्धवतक पूर्ण केले. हा सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडीयम येथे खेळला गेला.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जाॅनी बेअरस्टो यांची जोडी फोडण्यात पंजाबला यश मिळाले. मुजीब ऊर रहमानच या फिरकीपटूच्या गोलंदाजीला सामोरे जाताना बेअयरस‌्टो बाद झाला. ६ चेंढूत तो फक्त एक धाव करू शकला. त्यानंतर मोहम्मद नाबी, मनिष पांड्ये लवकर बाद झाले. वाॅर्नरने अर्धशतक केले. यासाठी त्याला विजय शंकरची बर्यापैकी साथ मिळाली. परंतु, तो ही बाद झाला. अखेरच्या षटकात दीपक हुडाने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे हैदराबाद दीडशे धावांपर्यंत मजर मारू शकला.

- Advertisement -

हैदराबादने दिलेल्या १५१ धावांच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पंजाबचा संघ पूर्णपणे सज्ज झाला. परंतु, पंजाबची सुरुवात गंडली. त्यामुळे धावगतीचा वेग मंदावला. पंजाबचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल लवकर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी डाव सावरला. या दोघांनी ११४ धावांची भागीदारी केली. परंतु, ऐन १८ व्या शतकात संदीप शर्माने मयांक अग्रवालला बाद केले. यानंतर डेव्हिड मिल्लरही संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोहमृमद नाबीने मनदीप सिंगचा बळी घेतला. परंतु, लोकेश राहुलने जराही दडपण न येऊ देता शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत पंजाबला जिंकून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -