घरमुंबई'विजयाची कीर्ती' असलेल्या कीर्तीकरांसमोर पळकुटे उमेदवार - आशिष शेलार

‘विजयाची कीर्ती’ असलेल्या कीर्तीकरांसमोर पळकुटे उमेदवार – आशिष शेलार

Subscribe

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराची सभा गोरेगाव येथे आज १६ एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत आशिष शेलार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

‘चार वेळा आमदार तर एक वेळा खासदार अशी विजयाची कीर्ती असणाऱ्या गजानन कीर्तिकर यांच्या समोर काँग्रेसचे पळकुटे उमेदवार उभे आहेत’, अशी खरमरीत टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराची सभा आज १६ एप्रिल ला गोरेगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आशिष शेलार यांनी केलेल्या भाषणात काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार यांचा खरपूस समाचार घेतला.

काय म्हणालेत शेलार 

आजच्या सभेची गर्दी पाहता गजानन कीर्तिकर यांचा विजय विक्रमी मतांनी होईल याबाबत आता कुणाच्या मनात शंका राहिलेली नाही. महायुतीसमोर जे कडबोळ आहे त्यांना ना नेता आहे, ना नीती आहे. त्यांचा फक्त एकच नारा आहे, तो म्हणजे मोदी हटाव. अशा कडबोळ्याला जनता उत्तर देणार आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम हे सुरुवातीला सेनेतून पळून गेले. नंतर उत्तर मुंबई मतदार संघातून पळून गेले. निवडणुका जवळ येताच त्यांना काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून पळवून लावले. मधल्या काळात खासदार गोपाळ शेट्टी यांच्या समोर पराभूत झाल्यानंतर ते जनतेची सेवा करायचे सोडून “बिग बॉसच्या” शोमध्ये जाऊन बसले होते. त्यानंतर तिथून ही ते पळून आले. त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील लढाई ही विजयाची कीर्ती असणाऱ्या कीर्तीकरांसमोर एक पळकुटा उमेदवार अशी आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर हे मुंबईच्या सहा ही मतदारसंघाच्या तुलनेत विक्रमी मतांनी विजयी होतील, याबाबत आमच्या मनात आता शंका राहिलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -