घरमुंबईयंदाच्या लोकसभा निवडणुकीत १६ हजार पोलीस करणार टपाली मतदान

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १६ हजार पोलीस करणार टपाली मतदान

Subscribe

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई पोलीस दलातील १६ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मतदानाचे कर्तव्य पार पाडणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.

मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी निवडणूकीत बंदोबस्तात व्यग्र असल्यामुळे त्यांना मतदानाला मुकावे लागत होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई पोलीस दलातील १६ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मतदानाचे कर्तव्य पार पाडणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आज, मंगळवारी पत्रकाराशी बोलताना दिली आहे. मुंबई पोलीस दलातील १६ हजारपेक्षा अधिक पोलिसांनी यंदाच्या निवडणुकीत टपाली मतदान करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ५०० कर्मचाऱ्यांनी या टपाली मतदानासाठी अर्ज केले होते. पोलिसांची १६ हजार मतं लोकसभा निवडणुकीत कुणाच्या पदरी पडून कुणाचे भाग्य उजाळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दलात ५३ हजार कर्मचारी कार्यरत

मुंबई पोलीस दलात ५३ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेची जवाबदारी असल्यामुळे त्यांना प्रत्येक निवडणुकीत मतदानाला मुकावे लागत होते. ५३ हजार पोलिसांपैकी ५०० पोलिसांनीच २०१४ च्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीत पोलीस दलातील सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील बंदोबस्तामुळे मुंबई बाहेर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मात्र मुंबईत राहणाऱ्या पोलिसांना जवळच्या बुथवर जाऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक ते दोन तासाची सूट देण्यात येते. मात्र मुंबई बाहेर राहणाऱ्या मुंबई पोलीस दलातील पोलिसांना मात्र मतदानाला मुकावे लागत असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबई बाहेरच्या पोलिसांना मतदानाचा हक्क बजावण्यात येणार असून १६ हजार पेक्षा अधिक पोलिसांनी टपाली मतदानासाठी अर्ज दाखल केले असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यातच फॉर्म-१२ चे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत १६ हजारपेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी हा अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले. हा फॉर्म भरण्याची मुदत अद्याप बाकी असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

ठराविक तारखेला मतदान

मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. स्थानिक पत्त्यानुसार त्यांना वास्तव्याच्या जवळपास असलेल्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करावे लागते. मात्र मतदानाच्या दिवशी बंदोबस्त असल्याने त्यांना मतदान करता येत नाही. फॉर्म-१२ भरलेल्या पोलिसांना मतदानानंतरची एक ठराविक तारीख निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिली जाते. त्याचप्रमाणे मतदान करण्याचे ठिकाणही कळवले जाते. त्यानुसार या तारखेला पोलिसाला मतदान करता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -