घरमुंबईकेडीएमसी: पोटनिवडणुकीत सेनेची बंडखोरी? दोन अर्ज दाखल

केडीएमसी: पोटनिवडणुकीत सेनेची बंडखोरी? दोन अर्ज दाखल

Subscribe

शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. महायुतीकडून माजी नगरसेवक सचिन बासरे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, प्रशांत पाटील हे सेनेचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जातात.

केडीएमसीच्या प्रभाग क्र. २६ (रामबाग खडक) या प्रभागात २३ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून माजी नगरसेवक सचिन बासरे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकिकडे प्रशांत पाटील हे सेनेचे कार्यकर्ते म्हणूनच ओळखले जात असल्याने सेनेकडून बंडखोरी झाली आहे. तर दुसरीकडे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आटापिटा सुरू झाला आहे. येत्या १० जून रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख आहे. त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना यश येतय का? याकडे लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये चोरट्यांनी भरदिवसा पेट्रोल पंपाची लाखोची कॅश लुटली

- Advertisement -

बासरे यांनाच का मिळाली उमेदवारी?

शिवसेनेच्या नगरसेविका आणि माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. महायुतीकडून सेनेने माजी नगरसेवक सचिन बासरे यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी महापौर विनिता राणे, शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमूख प्रकाश पाटील, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने पोटनिवडणूकीत उमेदवार उभा केलेला नाही. मात्र पाटील यांचा एकमेव अपक्ष अर्ज सादर झाला आहे. बासरे हे २०१० मध्ये काळा तलाव परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले हेाते. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. बासरे हे बाहेरच्या वॉर्डातील उमेदवार असल्याने सेनेच्या स्थानिक कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख असल्यानेच सेनेकडून त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -