घरमुंबईशिवसेनेचा वाघ काय असतो हे कामातून दाखवा - उद्धव ठाकरे

शिवसेनेचा वाघ काय असतो हे कामातून दाखवा – उद्धव ठाकरे

Subscribe

घोषणाबाजी करत बसू नका! शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहा,असा आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिला.

कोण आला रे, कोण आला,शिवसेनेचा वाघ आला… ही शिवसेनेची घोषणा आहे. मात्र शिवसेनेचा वाघ काय असतो हे आपल्या कामातून दाखवून द्या, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना कामाला लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक मनावर घेतली आहे. आता मंत्री, आमदार यांच्यासह सगळ्यांनी मला शेतकऱ्यासह शेतात दिसायला हवेत, अशी सुचना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत दिल्या. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेने मदत मोहीम सुरू केली आहे. यासाठी राज्यातील सर्व शिवसेनेचे मंत्री, आमदार,जिल्हा प्रमुख,संपर्क प्रमुखांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाल्याचे ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या पाठिशी रहायलाच पाहीजे ! राज्यात भीषण दुष्काळ आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना असून, शेतकऱ्याना सर्वोतोपरी मदत करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यानी शिवसेनेच्या नेत्यांना केले.
निवडणुकी पूर्ताच शेतकऱ्यांचा विषय मर्यादीत नाही. आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे. तसेच जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी शेतकऱ्यासोबत शेतात दिसायला हवेत, असे उद्धव म्हणालेत.

- Advertisement -

काय म्हणालेत नेमकं उद्धव ठाकरे ?

नुसत्या घोषणा म्हणजे वाचनपूर्ती नसून, घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं आपले काम आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नुसते चहा पिवू नका तर जनतेला अन्यायमुक्त करा,हीच शिवसेनेची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विजमाफी देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आज ही कुपोषण आणि आत्महत्येसारखे गंभीर प्रश्न सुटलेले नाहीत. आपण हे प्रश्न सोडवले नाहीत तर, लोक आपल्याला मत का देतील? असा
सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -