घरमुंबईअखेर पाच तासानंतर बेपत्ता सिद्धेशचा मृतदेह सापडला

अखेर पाच तासानंतर बेपत्ता सिद्धेशचा मृतदेह सापडला

Subscribe

पाच तासानंतर सिध्देश पवारचा मृतदेह सापडला आहे. बोटीमध्ये सिध्देशचा मृतदेह सापडला आहे. सिध्देश पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. मुंबईतील साताक्रुझमध्ये सिध्देश राहत होता. सहा महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले होते.

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या स्पीड बोटला अपघात झाला. अरबी समुद्रामध्ये खडकाला आदळून बोटीला अपघात झाला असून या दुर्घटनेमध्ये एक जण बेपत्ता झाला होता. तासाचा शोधानंतर अखेर बेपत्ता झालेल्या सिध्देश पवारचा मृतदेह सापडला आहे. अपघातग्रस्त बोटीमध्येच सिध्देश पवारचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुध्देश पवार हा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता होता. मृत सिध्देश पवारच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी ३ बोट जात होत्या. दरम्यान यामधील एका बोटीला अपघात झाला. खडकाला धडकून अपघात झालेल्या या बोटीमधून २५ शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते आणि काही अधिकारी प्रवास करत होते. या अपघात झालेल्या बोटीमध्ये पाणी शिरुन अवघ्या काही मिनिटामध्ये बोट बुडाली. या बोटीमध्ये असणाऱ्या इतर २४ जणांना कोस्टगार्ड आणि विमानाच्या सहाय्याने वाचवण्यात आले. मात्र यामध्ये सिध्देश पवार बेपत्ता झाला होता. अखेर सिध्देशचा मृतेदह सापडला आहे.

सिध्देश पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट होता

सिध्देश पवार मुंबईतील सांताक्रुझमध्ये राहत होता. या बोटीमध्ये सिध्देशसोबत त्याचे काका देखील होते. या अपघातामध्ये ते जखमी झाले आहेत. सिध्देश मुळचा बीडचा होता. गेल्या अनेक वर्षापासून तो विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता होता. सिध्देश पवार चार्टर्ड अकाउंटंट होता. तसंच सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सिध्देशच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

घटनेची सखोल चौकशी होणार

स्पीड बोट दुर्घटनेवरून राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांने या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, बोट दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर याप्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

अपघात की घातपात?

दरम्यान, अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणा-या बोटीला झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकार केवळ अपघातच आहे की, घातपात असा संशय जाणवू लागला आहे. कारण कालच विनायक मेटे यांनी शिवस्मारकात अनियमितता असल्याचा आरोप करणे. त्याच्या चौकशीची मागणी करणे आणि आज हा अपघात होणे हे संशयास्पद आहे. यामागे विनायक मेटेंना शांत करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -