घरमुंबईमुंबई - मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

भांडुप रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, दुपारी तीन वाजल्यापासून बिघाड

मुंबईच्या भांडुप स्थानकात सिग्ल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीला जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहेत. सीएसएमटी ते भांडुपच्या धीम्या मार्गावर परिणाम झाला आहे. तसंच कल्याणकडे जाणारी जलद लाईनही विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीतून कल्याणच्या दिशेने आणि कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने येणारी बंद करण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे एका मागोमाग लोकलच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या भांडुप स्थानकाजवळ पाहायला मिळत आहे.

भांडुप ते मुलुंड स्थानकादरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत. हा सर्व बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करायचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुपारच्या तीन वाजल्यापासून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्याचा परिणाम मध्य रेल्वे प्रवाशांवर होत आहे. धीम्या मार्गावरील अप- डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेत नेमका कसा बिघाड झाला आहे याचा शोध मध्य रेल्वेकडून घेण्यात येत आहे. पण, त्या आधी हा बिघाड दुरुस्त करुन वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -