घरमुंबईचुनाभट्टी अत्याचारप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमणार!

चुनाभट्टी अत्याचारप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमणार!

Subscribe

चुनाभट्टी बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जालन्यातील एका तरुणीवर मुंबईच्या चुनाभट्टी परिसरामध्ये बलात्कार झाल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने स्यु मोटो अन्वये स्वत:हूनच या घटनेची दखल घेऊन मुंबई पोलिसांना २९ ऑगस्ट रोजी नोटीस बजावली होती. या नुसार शनिवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित युवतीचे बंधू आणि तिच्या इतर नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसेच, न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलं.

पोलिसांसमक्ष पीडितेच्या नातेवाईकांशी चर्चा

दरम्यान, याचसंदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तरूणीच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यामध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमणुकीच्या महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे. या चर्चेदरम्यान घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे…

- Advertisement -

१. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी घटनेचा तपास ‘सीबीआय-सीआयडी’कडे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले जाईल

२. पीडितेच्या बंधूला पोलीस संरक्षण दिले जाईल

- Advertisement -

३. प्रारंभिक तपासादरम्यान मुंबईच्या पोलीस निरीक्षक श्रीमती शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याचा आरोप लक्षात घेऊन त्यांची चौकशी आणि त्याआधारे योग्य ती कारवाई

४. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात तज्ज्ञ, निष्णात डाक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) करावे. हे शवविच्छेदन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोर अवलंब करावा. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांची संमती

५. औरंगाबादमधील घाटी रूग्णालयातील डाक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही, हा आरोप लक्षात घेऊन संबंधित डाक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी

६. या घटनेमध्ये ‘मनोधैर्य’ योजनेंतर्गत पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य त्वरीत दिले जावे. त्यासाठी सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.


हेही वाचा – ‘त्या’ तरूणीच्या बलात्काराप्रकरणी राष्ट्रवादीचा मोर्चा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -