घरमुंबईभिवंडीत शोरुम फोडून सहा लाखांचे कपडे चोरले

भिवंडीत शोरुम फोडून सहा लाखांचे कपडे चोरले

Subscribe

भिवंडी वसई रोडवरील खारबाव येथील फॅशन स्टेशन हे कपड्यांचे शोरुम फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपरयांचे कपडे चोरले आहेत.

बुधवारी भिवंडी-वसई रोड वरील तालुक्यातील बाजारपेठेचे शहर म्हणून विकसित होत असलेल्या खारबाव येथे फॅशन स्टेशन हे कपड्यांचे शोरुम फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांचे कपडे चोरले आहेत. त्यामध्ये पैठणी ,महागड्या बनारसी साड्यांसह महागडे शर्ट चोरल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. खारबाव येथील व्यापारी धनंजय पाटील यांच हे दुकान आहे. दरम्यान, या चोरीमध्ये धनंजय पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सीसीटीव्ही देखील चोरले

व्यापारी धनंजय पाटील सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शोरुमचे मुख्य शटरला लावलेले कुलूप कापलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी आत जाऊन पहिले असता हा चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे चोरीसाठी आलेल्या चोरट्यानी शोरूम मधील सीसीटीव्ही डीव्हीआर सह इन्व्हर्टर, पंखे हे सुद्धा चोरून नेले आहेत .

- Advertisement -

चोरीची सहावी घटना

या घटनेने हतबल झालेले मालक धनंजय पाटील यांनी तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली .त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सांगडे यांनी घटनास्थळी धाव घेत या घरफोडीचा पंचनामा केला. सुदैवाने या शोरूमच्या नजीकच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्ही मध्ये चोरट्यांचे छायाचित्र कैद झाले आहे. त्यामाध्यमातून पोलिसांनी या घरफोडीचा तपास सुरु केला आहे. मागील दहा दिवसात खारबाव परिसरातील चोरीची ही सहावी घटना असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे. खारबाव येथे तालुका पोलिसांची बिट चौकी असून त्यामाध्यमातून रात्र गस्त सुरु नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा ठपका नागरिकांन कडून पोलिसांवर ठेवला जात आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -