घरमुंबईमुंबईत दोन ठिकाणी स्लॅब कोसळले; एकाचा मृत्यू, ८ जखमी

मुंबईत दोन ठिकाणी स्लॅब कोसळले; एकाचा मृत्यू, ८ जखमी

Subscribe

 एकाचा मृत्यू, तर आठ जखमी

मुंबईतील धारावी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुघर्टनेत एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी संध्याकाळी नागपाडा येथे अशाच प्रकारे दुघर्टना होवून तीन कामगार जखमी झाले आहेत. अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या धारावी आणि नागपाडा येथील या दोन घटनांमध्ये एकाचा मृत्यू आणि आठ कामगार जखमी झाले आहेत.

नागपाडा भागातील पीर खान रस्त्यावरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग सोमवारी साडेतीनच्या सुमारास कोसळला. या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने याठिकाणी कामगार अडकले जाण्याची शक्यता असल्याने ३ फायर इंजिन, ४ रुग्णवाहिका, २५ कामगार आणि जेसीबी, डंपर घटनास्थळी रवाना केले. तसेच एनडीआरएफच्या पथकाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या दोघांना प्रथम बाहेर काढण्यात आले, अडकलेल्या तीन कामगारांना बाहेर काढण्यात आले. त्यातील तीन कामगारांवर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोघांवर उपचार करून सोडून देण्यात आले.

- Advertisement -

तर मुंबईतील धारावी परिसरातील पीएमजीपी कॉलनीतील तळ अधिक २२ मजल्याचे बांधकाम सुरू असताना त्याची लोखंडी परात कोसळून रिक्षाचालक शहदाद अंसारी (३२) चा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यावेळी रिक्षा चालक येथील रस्त्यावरुन जात असताना त्यावर ही लोखंडी परात कोसळली होती. जखमींना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तिथून बाईकवरुन जाणारी एक व्यक्तीसुद्धा या दुर्घटनेत जखमी झाली. त्यांना आम्ही रुग्णालयात घेऊन गेलो. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली, असे पीएमजीपी कॉलनीतील रहिवाशी नईम कुरेशी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -