घरमुंबईसापाला पकडणे तरुणाला पडले महागात

सापाला पकडणे तरुणाला पडले महागात

Subscribe

उल्हासनगर येथे सर्प पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण आणि कोणतेही साहित्य सोबत नसताना एका तरुणांने घोणस या जातीच्या सर्पाला पकडण्याचा प्रयत्न केला असून सर्पाने तरुणाला दंश केले. यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सापाला पकडण्याचे कुठलेही प्रशिक्षण नसताना आणि कोणतेही साहित्य हातात नसताना देखील सापाला पकडणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. उल्हासनगर येथे रस्त्यावर आढळलेला घोणस जातीचा सर्प पकडताना सर्पाने तरुणाला दंश केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून या तरुणाला पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे.


वाचा – नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेत गमावले पाच महिन्याचे बाळ

- Advertisement -

नेमके काय घडले?

जंगल आणि झाडाची कत्तल याचे प्रमाण वाढल्यामुळे आता वन्यजीव शहरी परिसराकडे वळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत सापांचा उपद्रव वाढू लागला आहे. त्यामुळे कोणतेही प्रशिक्षण नसताना देखील आपण केलेल्या कामगिरींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे हा सध्याच्या तरुणांमध्ये छंद वाढू लागला आहे. शहरी भागात सर्प निघण्याचे प्रमाण वाढत असल्याने, सर्पमित्रांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र अनेकदा सर्प पकडण्याचा कुठलाही अनुभव आणि साहित्य नसताना अनेक तरुण सर्प पकडण्याचा प्रयत्न करत असतात. अशीच घटना उल्हासनगर येथे घडली आहे. उल्हासनगर येथील शांती नगर भागात रात्रीच्या वेळी घोणस जातीचा सर्प काही तरुणांना दिसला. त्यातील एका तरुणांने त्या सर्पाला पकडण्याचे ठरवले. मात्र या तरुणाकडे कोणत्याही प्रकारचे साहित्य नसताना देखील या तरुणांने धाडस करत सर्पाला पकडल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सर्पाला पकडल्यानंतर सर्पाने क्षणाचा ही विलंब न लावता त्या तरुणाला दंश केले त्यात हा तरुण जखमी झाला आहे. अतुल कहार (२१) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जखमी झाला असून त्याला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तरुणाची प्रकृती अधिकच खालावली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


वाचा – सापाचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्याला तोच साप डसला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -