घरमुंबईबहुतांश इमारत धारकांकडून महापालिकेची आग प्रतिबंधक यंत्रणा धाब्यावर

बहुतांश इमारत धारकांकडून महापालिकेची आग प्रतिबंधक यंत्रणा धाब्यावर

Subscribe

नवी मुंबईतील बऱ्याच इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले असून अशा इमाररतींना अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणी करुन उल्ल्ंघनाची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

‘तू मेल्यासारखे कर, मी रडल्यासारखे’ करतो अशी अवस्था सध्या महापालिका प्रशासनाची झाली असून कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काही पर्याय राहिला नाही. काही दिवसांपूर्वी वाशीतील पादचारी पूल पडून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर महापालिकेच्या रुग्णालयातील विकी इंगळे यांचा मृत्यू देखील झाला होता. तर ऐरोली येथील एका बहुमजली इमारतीच्या बावीसाव्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना ताजी असून या घटनेतून काही बोध घेऊन त्यावर अमंलबजावणी करण्याऐवजी फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले आहे. गत आठवड्यात ऐरोली येथील एका बहुमजली इमारतीच्या बावीसाव्या मजल्यावरील घराला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, या इमारतीतही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका पुन्हा खडबडून जागी झाली असून महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील इमारतीची अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणी करुन उल्ल्ंघनाची अनेक इमारतीधारकांस नोटीस बजावण्यात आलेली आहे.

नियमांचे उल्ल्ंघन करणाऱ्यांना नोटीस

महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना नियम २००९ अन्वये प्रत्येक इमारतीमधील आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वीत असल्याबाबत शासन मान्यता प्राप्त लायसन्स अभिकरणामार्फत विहित नमुन्यातील प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाकडे सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत महानगरपालिका क्षेत्रातील इमारतीची अग्निसुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणी करुन उल्ल्ंघनाची नोटीस अनेक इमारतीधारकांस बजावण्यात आलेली आहे. परंतु, आजतागायत बहुतांश इमारत धारकांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वीत असल्याचे प्रमाणपत्र लायसन्स अभिकरणामार्फत सादर न केल्याचे अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना नियम २००९ मधील कलम ८ (२) अन्वये अशाप्रकारे आगप्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यन्वित नसल्याचे आढळून आल्यास संबधित इमारतीची वीज पुरवठा आणि पाणी नळ जोडणी खंडीत करण्याची तरतूद आहे, असे असूनही मनपाकडून कारवाई करण्यात येत नसल्यामुळे महापालिकेची आग प्रतिबंधक यंत्रणा सर्रास इमारत धारकांकडून धाब्यावर बसवली जात आहे. माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या नवी मुंबईकरांत आग सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता असल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांत नियमाने बंधनकारक असलेली आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याचे समोर आले आहे. अशा गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने वारंवार नोटीसा बजावल्या जातात. मात्र, सोसायट्यांकडून या नोटिसांना केराची टोपली दाखविली जाते. विशेष म्हणजे, आगीची एखादी दुर्घटना घडली की, महापालिकेला या संदर्भात पुन्हा जाग येते. त्यानंतर पुन्हा नोटीसा बजावण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ठोस कार्यवाहीला बगल देत दोन्ही घटकांकडून आपली जबाबदारी आणि कर्तव्यात कसूर केली जात असल्याने शहरात आग प्रतिबंधक यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.


वाचा – नवी मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -