घरमुंबईउघड्या गटारावर भरतो शनिवारचा 'आठवडे बाजार'

उघड्या गटारावर भरतो शनिवारचा ‘आठवडे बाजार’

Subscribe

आठवडे बाजारांचा महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या नागरी कामांचा अडथळा ठरत असून त्यावर उपाय म्हणून आठवडे बाजारमधील फेरीवाल्यांनी थेट काम सुरु असलेल्या गटारांवरच बाजार मांडला आहे.

शहरातील आठवडे बाजारांवर महापालिकेकडून अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत असतांनाही अनेक ठिकाणी आठवडे बाजाराचे पेव फुटले आहे. याच आठवडे बाजारांचा महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या नागरी कामांचा अडथळा ठरत असून त्यावर उपाय म्हणून आठवडे बाजार मधील फेरीवाल्यांनी थेट काम सुरु असलेल्या गटारांवरच बाजार मांडला आहे. धोकादायक पद्धतीने असा हा बाजार चालवला जात असून याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.याच बाजारात भविष्यात एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे.

या ठिकाणी भरतो ऐठवडे बाजार

ऐरोलीतील सेक्टर ८, १७, , ३ येथे फेरीवाल्यांची आठवडे बाजाराच्या नावाखाली ठाण मांडले आहे. हे अनधिकृत बाजार वाहतुकीस अडथळा ठरत असून यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यातल्यात्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी सेक्टर ८ येथील गणपती बाप्पा चौकात भरविला जाणारा बेकायदेशीर आठवडे बाजार हा चक्क अर्धवट स्थितीत असलेल्या गटारावर (फुटपाथ) भरविला गेल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. या गटारावर फुटपाथ होणार असून, सदर गटाराचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे काही ठिकाणी लाकडाच्या फळ्या टाकून त्यावर काही विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. तर काही विक्रेत्यांनी बिनधास्त पणे भर रस्त्यावर आपले दुकान थाटल्याने संपूर्ण रस्ता अडगळीत  झाला आहे. नागरिकांना येण्याजाण्यासाठी लाकडी फळ्यांचा वापर केला जातोय. या बाजारात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच येतात. आशा या उघड्या गटारावर टाकलेल्या फळ्यावरून लोकं जीव धोक्यात टाकून येजा करतात, परंतु एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही यावर उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर

या आठवडे बाजारामधील विक्रेत्यांकडे बंद करण्यात आलेल्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. तसेच आठवडे बाजार संध्याकाळी भरत असल्याने लोकांची झुंबड उडते. याचाच गैरफायदा घेण्यासाठी क्षेत्रात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले असून महिलांची पर्स कापणे, पैसे चोराने, मोबाईल चोरने अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. सदर बेकायदेशीर बाजारा बाबत अनेक सुजाण नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप कोणतीही कारवाई पालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही. कारवाई करण्याकरिता पालिकेची अधिकारी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघत आहेत का? जर एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? अशा बेकायदेशीर बाजारावर कोणतीही कारवाई न करणारी महानगरपालिका का मग या सर्व गंभीर गोष्टींवर दुर्लक्ष करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी?, असा सवाल ऐरोलीकरांना पडला आहे. याबाबत विभाग अधिकारी अनंत जाधव यांना विचारले असता, गटारावर फळ्या टाकून जर अनधिकृत व्यवसाय सुरू असेल तर ते चुकीचे असून येत्या शनिवारी अनधिकृत बाजारावर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -