घरमुंबईरेल्वे तिकीट काऊंटरवर येणार ताण; एटीव्हीएवरील कमिशनमध्ये कपात

रेल्वे तिकीट काऊंटरवर येणार ताण; एटीव्हीएवरील कमिशनमध्ये कपात

Subscribe

नितीन बिनेकर/मुंबई

रेल्वे मंत्रालयाने तिकिटांसाठीच्या रांगा टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये अत्याधुनिक एटीव्हीएम यंत्रणा सुरु केली होती. एटीव्हीएम मशीन हाताळण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त अधिकाऱ्यांना रोजगार देण्याचा हेतू रेल्वेने बाळगला होता. मात्र या हेतूला आता रेल्वेनेचं हरताळ फासला आहे. या मशीनमधून देण्यात येणाऱ्या मशीनमध्ये रेल्वेने दोन टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे एटीव्हीएमवर तिकीट देणारे निवृत्त अधिकाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे चाकरमानी पुन्हा तिकीट खिडकीवर रांगा करू लागले आहेत. यामुळे गर्दी वाढू लागल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

रेल्वे तिकीटासाठी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरातल्या लोकल स्थानकांवर एटीव्हीएम तिकीट मशीन बसवले. फायदा होत असल्याने स्मार्टकार्ड घेऊन तिकीट घेणाऱ्यांची संख्या वाढत होती. मात्र अचानक रेल्वे मंत्रालयाने स्मार्ट कार्डद्वारे घेतल्या जाणाऱ्या तिकीटवरील कमिशनमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पाच टक्क्यांनी मिळणाऱ्या कमिशनमध्ये  दोन टक्क्यांची कपात करण्यात आली. केवळ तीन टक्क्यांसाठी स्मार्टकार्डमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवाशी इच्छुक नाहीत. ते पुन्हा तिकीट खिडकीच्या रांगेत उभे राहू लागले आहेत.

तांत्रिक त्रुटीमुळे होते नुकसान
एटीव्हीएम स्मार्ट कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या अल्प असल्याने रेल्वे मंत्रालयाने याएटीव्हीएम मशीनवर तिकीट काढून देण्यासाठी निवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार निवृत्त अधिकारी आपल्या स्मार्टकार्ड मध्ये हजारो रुपयाचे रिचार्ज मारून लोकांना तिकीट काढून देण्याचे काम करत होते. मात्र रेल्वेच्या नव्या निर्णयामुळे रेल्वे निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्मार्टकार्डद्वारे तिकीट देण्याचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण याचबरोबर बदलापूर, अंबरनाथ, वडाळा, चेंबूर, वाशी या रेल्वे स्थानकांत सर्वाधिक एटीव्हीएमचा वापर होतो. या स्थानकावरून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. विश्वनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या एकूण तिकीट विक्रीत ‘एटीव्हीएम’ मशीनमार्फत होणारी तिकीट विक्री सरासरी २७ टक्के इतकी आहे. तर काऊंटरवरून होणारी तिकीट विक्री सरासरी ५४ टक्के इतकी आहे. एक रुपया अतिरिक्त मोजून तिकीट विकत घेणाऱ्या प्रवाशांची संख्या १८ टक्के इतकी आहे. तर इंटरनेटच्या माध्यमातून केवळ ५.४ टक्के तिकीट विक्री होत आहे. आता एटीव्हीएमवरील प्रवाशांची गर्दी तिकीट खिडकीवर येऊन पुन्हा तिकीटसाठी रांगा लावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

” एटीएमद्वारे तिकीटवर पाच टक्केकमिशन देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाचा होता. १ एप्रिल २०१८ पासून स्मार्ट कार्डच्या माध्यमातून रेल्वे टिकी विक्री करणारे निवृत्त अधिकाऱ्यांना मिळणारे कमिशन ५ टक्के वरून ३ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एटीव्हीएम मशिन वरून तिकीट विकणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना ३ टक्केचं कमिशन मिळणार आहे. “

 

डॉ. ए.के. सिंह
मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -