घरदेश-विदेशब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Subscribe

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. ओरिसाच्या किनारपट्टीलगत असलेल्या परिसरात आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी संरक्षण संशोधन व विकास मंडळाच्यावतीने ही चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून ते ध्वनीच्या तीनपट वेगाने उडू शकते. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली असून याचे नाव हे दोन्ही देशात वाहणाऱ्या नद्यांवरुन (भारत – ब्रम्हपुत्रा नदी, रशिया – मॉस्कवा) ठेवण्यात आले आहे. यापूर्वी मार्च माहिन्यात पोखरण विभागात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शुभेच्छा…

- Advertisement -

संरक्षण संशोधन व विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, हे क्षेपणास्त्र सकाळी १०वा. ४० मि. बालासोरजवळील चांदीपूर येथून मोबाईल लाँचरच्या माध्यामातून लाँच करण्यात आले. सुमारे १० ते १५ वर्षांपर्यंत कालावधी वाढवलेले ब्रह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय सशस्त्र दलात सामील होणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मिती खर्चात मोठी बचत होणार असल्याचे ट्विट निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

- Advertisement -

– कसं आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्र

ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमानाने बनविले जात असून त्याचा वापर २००७ पासून भारतीय संरक्षण दलात होत आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे क्षेपणास्त्र डागल्यानंतर स्वत: वर आणि खाली उड्डाण करून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता यात आहे. त्यामुळेच भारतीय लष्कराने आपल्या शस्त्रागरातील तीन रेजिमेंटमध्ये ब्रह्मोसचा समावेश केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -