घरमुंबईलालपरीच्या अपघातांत घट...

लालपरीच्या अपघातांत घट…

Subscribe

‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’, असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ मागील काही वर्षांपासून मात्र वाढत्या अपघात संख्येमुळे बदनाम झाले होते. परंतु, आता या अपघात संख्येत घट झाल्याने महामंडळ पुन्हा एकदा सुरक्षित प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. 2013-14 मध्ये एसटी महामंडळाच्या गाड्यांचे ३ हजार 78 अपघात झाले होते. परंतु 2017-18 मध्ये ही संख्या २ हजार 32 झाली. सुमारे १ हजार 46 अपघातांची यात घट झाली आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बसगाड्या आहेत, त्यात साध्या, लाल डबा, शिवशाही, शिवनेरी अशा बसगाड्यांचा समावेश आहे. दररोज सुमारे ६३ लाख प्रवाशांची ने-आण एसटीमार्फत केली जाते. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हे एसटीचे ब्रीदवाक्य आहे. लांबचा प्रवास आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणार्‍या एसटीच्या चालकांकडून होणारे अपघात शुन्यावर आणण्यासाठी महामंडळातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्याच्या कानाकोपर्‍यात एसटी बसगाडी पोहोचते. तसेच सुरक्षित प्रवासासाठी प्रवासी आवर्जून एसटीला पसंती देतात. त्यामुळे खासगी बसगाड्यांच्या अपघातांच्या तुलनेत एसटीच्या बसगाड्यांच्या अपघातांमध्ये आता घट झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीच्या बसगाड्या संख्येने कमी आहेत. एसटीच्या चालकांकडून होणार्‍या अपघातांमध्ये दरवर्षी घट होत आहे. परंतु ही संख्या शुन्यावर आणण्यासाठी महामंडळाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. अपघात कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी चालकांचे समुपदेशन केले जाते. विशेष म्हणजे एसटी महामंडळाने अपघात सहायता निधीमध्ये वाढ केली आहे. अपघातात मृतांच्या वारसाला १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाखांपर्यंत तर किरकोळ जखमींना २.५० लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय खर्च दिला जातो. त्यामुळे अपघात संदर्भात कोर्टात दाखल करण्यात येणार्‍या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

अपघातांची आकडेवारी
=============================
वर्ष अपघात मृत्युमुखी
============================
2013-14 3,154 533
2014-15 3,172 494
2015-16 2,920 445
2016-17 2,772 445
2017-18 2,922 420
नोव्हेंबर 2018 पर्यंत 2,231 321
========================
अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या प्रवाशांची संख्या
============================
वर्ष एसटीचे प्रवासी एसटीचे कर्मचारी इतर वाहनांतील प्रवासी
2013-14 105 09 344
2014-15 60 11 354
2015-16 64 09 278
2016-17 65 12 283
2017-18 40 12 291
नोव्हेंबर 2018 पर्यंत 28 06 287

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -