घरमुंबईएमएमआरडीएत आता ई टॉयलेट्सचा प्रयोग

एमएमआरडीएत आता ई टॉयलेट्सचा प्रयोग

Subscribe

वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये भुयारी, उन्नत मेट्रो, बुलेट ट्रेन यासारखे अनेक महत्वकांशी प्रकल्पाचे प्रयोग होत असतानाच आता या प्रकल्पांमध्ये ई टॉयलेट्सची भरदेखील पडणार आहे. बीकेसीमधील वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता दहा ई टॉयलेट्स बांधणार आहे.

एमएमआरडीएने ई टॉयलेट्सच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात केली आहे. या निविदा प्रक्रियेला एकदा मुदतवाढही देण्यात आली आहे. एमएमआरडीएमध्ये विविध शासकीय कार्यालयांसोबतच खाजगी कार्यालये यांचाही समावेश आहे. नागरिकांची टॉयलेट्सची गरज पाहूनच आता एमएमआरडीएने नागरिकांसाठी हा एडव्हान्स असा पर्याय देऊ केला आहे. ई टॉयलेट्समध्ये असणार्‍या सेन्सर्समुळे हे टॉयलेट प्रत्येक पाच वापरकर्त्यानंतर ऑटोमॅटिक पद्धतीने स्वच्छ होणार आहे.

- Advertisement -

महत्वाचे म्हणजे टॉयलेट स्वच्छतेसाठी कोणत्याही व्यक्तीची नेमणुक होणार नाही. देशभरात हगणदारी मुक्तीची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये बीकेसी परिसरात उघड्यावर हगणदारी होत असल्याचे २०१७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात निदर्शनास आले होते. त्यामुळेच बीकेसीमध्ये एमएमआरडीने ई टॉयलेट्सचा पर्याय वापरला आहे. या परिसरात येणार्‍या नागरिकांना तसेच रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरलाही या टॉयलेट्सचा फायदा होईल असा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -