घरमुंबईहिरायामाने त्रस्त असलेल्या २० वर्षीय तरुणाला नवसंजीवनी

हिरायामाने त्रस्त असलेल्या २० वर्षीय तरुणाला नवसंजीवनी

Subscribe

मुंबईतील एका २० तरुणावर हिरायामा या चेतापेशीच्या दुर्मिळ आजारावर पेशींवर आधारित उपचार करून जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

मुंबईतील एका २० तरुणावर हिरायामा या चेतापेशीच्या दुर्मिळ आजारावर पेशींवर आधारित उपचार करून जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. प्रसाद बाहेरक असे या तरुणाचे नाव असून त्याला आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये कमकुवतपणा जाणवत होता. हळुहळू त्याच्या सर्वच बोटांवर परिणाम झाला आणि तो कोणतीही वस्तू धरू शकत नव्हता. ही परिस्थिती अधिक गंभीर होत गेली आणि त्याला दैनंदिन कामांमध्ये अडथळे येऊ लागले. त्याच्या कुटुंबीयांनी मेंदूविकारतज्ज्ञाची भेट घेतली. त्यांनी तपासणी केल्यानंतर प्रसादला हिरायामा आजार झाल्याचे निदान केले.

प्रसाद बाहेरक

त्यानुसार, मुंबईतील रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी हिरायामा डिसीज या दुर्मीळ मोटर न्यूरॉन (चेतापेशीय) आजाराने त्रस्त असलेल्या या तरुणावर पेशीवर आधारीत थेरपीने उपचार केले. ही एक सर्व्हायकल मायलोपथी (पाठीचा कणा चेपणे) आहे. यामुळे मनगट आणि हातांमध्ये हळुहळू अशक्तपणा येत जातो. हा आजार बहुधा तरुण पुरुषांना होतो.

- Advertisement -

मेंदूचा दुर्मीळ आजार

हिरायामा डिसीज (एचडी) हा मेंदूचा दुर्मीळ आजार आहे. मुलांमध्ये अधूनमधून होणारा स्नायूंचा शोष असतो. हा प्रकार शरीराच्या वरील भागातील परिघीय अवयवांमध्ये घडतो. त्याचा मुख्यत: मानेच्या भागातील कण्यावर परिणाम होतो. २० वर्षातील तरुणांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. हा आजार अत्यंत दुर्मीळ आहे आणि हा आजार झालेल्या अत्यंत तुरळक रुग्णांच्या नोंदी आहेत. किशोरावस्थेत या आजाराची सुरुवात होते आणि या आजाराला सुरुवात झाल्याच्या जवळपास ५ वर्षांनंतर या लक्षणांची वाढ थांबत असल्याचा अनुभव बहुतेक व्यक्तींना येतो.

पारंपरिक औषधे वेदनाशामक उपाय करतात तर रिजनरेटिव्ह मेडिसीन आणि पेशीवर आधारीत उपचार मेंदू/पाठीच्या कण्यातील नष्ट झालेल्या पेशींवर म्हणजेच इशेमियावर उपचार करतात.
– डॉ. प्रदीप महाजन, मेडिसीन रिसर्चर, रिजनरेटिव्ह

- Advertisement -

फंक्शनल स्टिम्युलेशन

चेतायंत्रणेतील ऊतींच्या वाढीशी संबंध गुणधर्म असलेले पेशी आणि वाढीशी संबंधित घटक चेतासंस्थेतील नुकसान झालेल्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी मदत करतात. त्याचप्रमाणे मस्क्युलोस्केलेटल यंत्रणा साध्य केली जाऊ शकते. प्रसादला पेशीवर आधारीत उपचारांची दोन सत्रे घेण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्याला फंक्शनल स्टिम्युलेशन – आधारित पुनर्वसन उपचार आणि फिजिओथेरपी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -