घरताज्या घडामोडीSushant Singh Rajput : 'सुशांतची ऑटोप्सी जाणून बुजून उशिरा केली!'

Sushant Singh Rajput : ‘सुशांतची ऑटोप्सी जाणून बुजून उशिरा केली!’

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातलं गूढ अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. आधी मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि आता CBI या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीबीआयच्या टीम गेल्या दोन दिवसांपासून सुशांतच्या घरी घटनेच्या रिक्रिएशनच्या माध्यमातून तपास करत आहेत. त्यासोबतच आता लवकरच रिया चक्रवर्तीला देखील सीबीआय चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे Sushant Singh Rajput Suicide प्रकरणी बॉलिवुडसोबतच राजकीय वर्तुळातीलही काही मोठी नावं गुंतल्याची चर्चा सुरू झालेली असताना दुसरीकडे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी या प्रकरणात गंभीर आरोप करणारे दावे करत असल्यामुळे सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच करण्यात आली आहे, यावर मोठी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

काय म्हणणंय सुब्रह्मण्यम स्वामींचं?

सोमवारी सुब्रह्मण्यम स्वामींनी ‘आत्महत्येच्या दिवशी सुशांत दुबईच्या ड्रग्ज डिलरला भेटला होता. त्यामुळे त्याच्या हत्येमध्ये दुबईच्या ड्रग्ज डिलरचं कनेक्शन आहे’, असा दावा करणारं ट्वीट केलं होतं. याआधी देखील सुब्रह्मण्यम स्वामींनी ‘सुशांत सिंह राजपूतची पूर्ण नियोजन करून हत्या करण्यात आल्या’चा अनेकदा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या दाव्याला पुष्टी देणारा नवा दावा Subramanian Swamy यांनी केला आहे. ‘सुशांतची ऑटोप्सी (Autopsy) जाणूनबुजून उशिरा केली गेली, जेणेकरून त्याच्या पोटातल्या विषाचा प्रभाव क्षीण होऊन जावा आणि त्यामुळे ते ऑटोप्सीमध्ये डिटेक्ट होऊ नये. त्यामुळे आता या प्रकरणात जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आली आहे’, असं सुब्रह्मण्यम स्वामी या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

- Advertisement -

CBI चं पथक मुंबईत ठाण मांडून

गेल्या ४ दिवसांपासून सीबीआयची ४ पथकं मुंबईत ठाण मांडून बसली आहेत. आपल्या तपासादरम्यान सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, नोकर नीरज सिंह, दीपक सावंत यांची चौकशी केली आहे. त्यासोबतच सुशांतच्या मृतदेहाचं पोस्ट मार्टेम करणाऱ्या कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यासोबतच सुशांतच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात आर्थिक बाबींचा देखील सीबीआय तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -